जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात 98.29% टक्के जलसाठा उपलब्ध आहे. नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा.

जिंतुर (अजमत पठाण ):-
जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण हे अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरण्यात सध्या स्थितीत 98.29% टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
मे महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील येलदरी येथील धरणाच्या जलाशयात उपयुक्त पाणीसाठा केवळ २८ टक्के उपलब्ध होता व आजरोजी 98.29% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
येलदरी धरणाच्या पाण्यावर लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी सिंचनाचा लाभ होतो. याशिवाय परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील अडीचशे पेक्षा जास्त गावे, वाड्या, तांडे यांची तहान भागवली जाते.
येलदरी धरणात 98.29% टक्के पाणीसाठा उपलब्ध असून
आज दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी येलदरी धरण पाणीसाठा 98.29% झाला असून सध्यस्थितीत खडकपूर्णा धरणातून सुमारे 44395 Cusecs विसर्ग चालू आहे. त्यामुळे येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात येवा येत आहे.
तरी आज दि.12.10.2024 रोजी दुपारी 12.15 ला जलविद्युत केंद्रातील दोन टरबाईन चालू करून त्याद्वारे 1800 Cusecs विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.
करिता पूर्णा नदी काठच्या गावांतील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदी पत्रात गुरे, लहान मुलं, व कोणी मासेमारी तथा नदी पात्रातून वाहतूक करू नये असे येलदरी धरण पूर नियंत्रण कक्षा कडून सांगण्यात आले आहे.
येलदरी हे धरण जिंतूर येथुन १५ किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण पूर्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे 1968 साली तालुक्यातील येलदरी या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. पूर्णा नदी गोदावरी नदीची प्रमुख उप नदी आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठ्या धरणाच्या यादीत येलदरी या धरणाच्या ७वा क्रमांक लागतो. येलदरी धरण बांधण्याचा प्रकार मातीचा भराव व दगडी बांधकाम असून बांधकाम अजून मजबूत आहे.