जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघात एकूण ४३८ मतदान केंद्र; दोन संवेदनशील .
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
जिंतूर (अजमत पठाण):- 15 ऑक्टोबर २०२४ रोजी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 चे नाम निर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2024 आहे तर नामनिर्देशन भद्राची छाननी 30 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख ०४ नोव्हेंबर असणार आहे. मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून मतमोजणी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
जिंतुर विधानसभा मतदारसंघात 1 लाख ९८ हजार ९३२ पुरूष, 1 लाख ८६ हजार ४४० महिला, 11 तृतीयपंथी आणि सैन्य दलातील ९४ असे एकूण 3 लाख ८५ हजार ४७७ मतदार आहेत. तसेच शहरी ८३ व ग्रामीण २५५ असे एकूण ४३८ मतदान केंद्र असून ०२ केंद्र संवेदनशील असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेश सरोदे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.याप्रसंगी नायब तहसीलदार प्रशांत राखे, युवराज पौळ व आदी कार्मचारी यांची उपस्थिती होती.

निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरोदे यांनी सांगितले की, जिंतूर मतदारसंघाअंतर्गत दिव्यांग मतदार संख्या १ हजार २६७, 85 वर्षेपेक्षा अधिक वयाचे ७ हजार ९९१ आणि 18 ते 19 वर्षे वयोगटातील ९ हजार ९४ मतदार आहेत. १ हजार पुरूष मतदारांच्या तुलनेत एकूण ९३७ स्त्रिया असे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे असे सांगितले आहे. जिंतूर सेलू विधानसभा निवडणुकीचे स्ट्रांगरुम व मतमोजणी ठिकाण जिंतूर औंढा रोडवरील आयटीआय जिंतूर येथे करण्यात आले आहे.
यावेळी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत तसेच मतदारांचा निवडणुकीत अधिकाधिक सहभाग वाढवा म्हणून नाम निर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांक पासून वोटर सिलीप चे मतदारांना बीएलओ मार्फत वाटप करण्यात येणार आहे. 2019 च्या जिंतूर-सेलु विधानसभा निवडणुकीत ७२.८८% मतदान झाले असल्याची माहिती तहसीलदार राजेश सरोदे यांनी दिली.

जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.