जिंतूर-सेलु मधून सौ.मेघना साकोरे बोर्डीकर यांना उमेदवारी जाहीर
जिंतूर (अजमत पठाण)
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने रविवारी दुपारी महाराष्ट्रातील 99 मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यातून जिंतूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव तथा मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्या पाठोपाठ विदर्भ, खानदेश, मराठवाडाच्या काही जिल्ह्यातील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यांचा उमेदवारी अर्ज 28 ऑक्टोंबर सोमवार रोजी दाखल करण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव मधून राजेश संभाजी पवार, मुखेडमधून तुषार राठोड यांना तर हिंगोलीतून विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे, परतुरमधून माजी मंत्री बबनराव लोणीकर, बदनापूर मधून नारायण कूचे, भोकरदन मधून संतोष रावसाहेब दानवे, फुलंब्री मधून श्रीमती अनुराधाताई अतुल चव्हाण, संभाजीनगर मधून अतुल सावे,गंगापूर मधून प्रशांत बंब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?