चढावर चढतांना बसला ब्रेक न लागल्याने आली माघारी; भोसी रस्त्यावरील घटना
सुदैवाने जीवित हानी टळली.
जिंतूर(अजमत पठाण):जिंतूर बसस्थानकातून 80 प्रवासी घेऊन कावीकडे जाणारी एसटी बस शेवडीच्या पुढील भोसी रस्त्यावरील चढावर चढतांना अचानक ब्रेक न लागल्याने माघारी आल्याने बसमधील प्रवाशांमध्ये मोठा गदारोळ उडाला.त्यातील काहींनी दारातून उड्या मारल्या.बस रस्त्याखाली उतरल्याने थांबली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी(दि.10)सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
जिंतूर आगाराची बस क्रमांक एम.एच.20 बी.एल.0588 ही 80 ते 90 प्रवासी घेऊन कावी कडे जात होती शेवडी पाटी ओलांडल्यानंतर भोसीकडे ही बस निघाली.परंतु,चढावर चढत असतांना अचानक ब्रेक न लागल्याने माघारी येवू लागली,त्यामुळे हादरलेल्या प्रवाशांमध्ये एकच गदारोळ उडाला. घाबरून काही प्रवाश्यानी चालत्या बस मधून खाली उड्या मारल्या.
बस चालकाने ब्रेक मारून बस थांबवण्याचा प्रयत्न केला,परंतु बस न थांबता पाठीमागून येणार्या जिंतूर ते सावरगावकडे जाणार्या एम.एच.14 बी.टी.2163 या बसला धडकली अन् रस्त्याखाली उतरुन थांबली.त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
जिंतूर अगार एकेकाळी जिल्ह्यात सर्वात जास्त नफा कमावणारे आगार म्हणून प्रसिद्ध होते, परंतु, तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणार्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे या रस्त्यावरुन जाणार्या सर्व बसेस खिळखिळ्या होवून नादुरुस्त झाल्या आहेत. जिंतूर-परभणी सारख्या चकचकीत रस्त्यावर दररोज बसेस नादुरुस्त होण्याच्या घटना घडत आहेत, तर ग्रामीण भागातील बसेसची तर आणखीन भयावह अवस्था आहे.


जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.