जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
जिंतूर (गुणिरत्न वाकोडे):- नुकतेच जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निकाल जाहीर झाले असून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात लढलेल्या या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत भाजपची सरशी दिसून येत आहे. तरी काही ठिकाणी जी मोठी गट आहेत ज्यात बोरी,चारठाणा,भोगाव व कोसडी येथे भाजपला जोरदार धक्का बसल्याचे चित्र आहे.
बोरी गटात नेहमीप्रमाणे अजय चौधरी यांची ताकद दिसून आली असून बोरी गटात दिपाली अजय चौधरी यांचा दणदणीत विजय झाला.चारठाणा येथे भाजपच्या उमेदवार मीनाताई नानासाहेब राऊत व भाजपकडून इच्छुक असलेले सोनाली इंद्रजीत घाटूळ यांच्या मत विभागणीचा फटका भाजपला बसला असून या जागी राष्ट्रवादीची लॉटरी लागली आहे. येथे राष्ट्रवादीच्या सरुबाई शंकर जाधव यांचे नशीब चमकले. त्यांचा 634 मे विजय झाला आहे.
भाजपला धक्का बसला असून येथे भाजपकडून इच्छुक असलेले पण तिकीट न भेटल्यामुळे राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळवलेले माणिक शेषराव हरकळ यांचा दणदणीत विजय झाला आहे येथे त्यांनी भाजपचे प्रभाकर बालासाहेब रोहिनकर यांचा पराभव केला.

पुढील प्रमाणे गट व गणात उमेदवारांनी घेतलेले मतदान
*वरूड जिल्हा परिषद गट* :: संगीता राजेंद्र थिटे 8409 (भाजप) विजय, दिसते संगीता विजय खिस्ते 6674 (राष्ट्रवादी) 1735 मतांनी पराभूत,*चारठाणा जिल्हा परिषद गट*:: राष्ट्रवादीच्या सर्व शंकर जाधव 5475 मते दोन विजयी त्यांनी अपक्ष उमेदवार सोनाली इंद्रजीत घाटूळ यांचा 634 मतांनी पराभव केला.त्यांना 4811 मते पडली तर मीनाताई नानासाहेब राऊत हे तिसऱ्या स्थानी असून त्यांना 4132 मते पडली.भाजपचे मीनाताई नानासाहेब राऊत व अपक्ष सोनाली इंद्रजीत घाटूळ यांच्या मत विभागणीचा फटका भाजपला बसला असून या ठिकाणी सर्व शंकर जाधव राष्ट्रवादीच्या विजय झाल्या आहेत.

*बोरी जिल्हा परिषद गट*:: चर्चेत असलेल्या या जिल्हा परिषदेमध्ये अपेक्षित प्रमाणे दिपाली अजय चौधरी यांनी 9017 मग ते घेऊन राष्ट्रवादीच्या डॉ. विद्या कालिदास चौधरी यांचा दणदणीत पराभव केल्याचे दिसून आले. भाजपच्या डॉ.विद्या चौधरी यांचा तब्बल 2199 मतांनी पराभव झाला. डॉ विद्या चौधरी यांना 6818 मते पडली.

*वस्सा जिल्हा परिषद गट*:: या गटात अपेक्षा प्रमाणे मनीषा अभिजीत पारवे भाजप यांनी 9726 मते घेऊन राष्ट्रवादीच्या शालिनीबाई शिवाजीराव राऊत यांचा 5383 मतांनी दणदणीत पराभव केला.या गटात काँग्रेसच्या सुनीता भारत पवार यांनी 415 मते घेतली.*कोसडी जिल्हा परिषद गट*:: या गटात माणिक शेषराव हरकळ (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी 7565 मते घेऊन त्यांनी भाजपचे प्रभाकर बालासाहेब रोहनकर(6255 मते)यांचा 1310 मतांनी पराभव केला. या गटात अनंतराव रामराव कोरडे (काँग्रेस) यांनी 271 मते घेतली.
चारठणा जिल्हा परिषद गट *पंचायत समिती गणात 20 पैकी 14 भाजप तर राष्ट्रवादी सहा जागी विजयी भाजपचे मातब्बर नानासाहेब राऊत, डॉ. विद्या चौधरी, प्रभाकर वाघीकर यांना धक्काभोगाव,बोरी, चारठाणा या मोठ्या गटात भाजपला धक्का कौसडी गटात भाजपला उमेदवारास नकार पडला महागात मीनाताई नानासाहेब राऊत पराभूत:: घाटूळ व राऊत यांच्या मत विभागणीचा राष्ट्रवादीला फायदा*:: या गटात भाजपच्या वटाणे रोहिणी ज्ञानेश्वर भाजप या 7824 मध्ये घेऊन विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीचे घुगे बाळासाहेब रविंद्र आसाराम यांचा अवघ्या 41 मतांनी पराभव केला. बाळासाहेब घुगे यांना 7783 मते पडली.
*वाघी धानोरा जिल्हा परिषद गट*:: या गटात भाजपचे रोहित नामदेव चव्हाण यांनी 6912 मते घेऊन विजय संपादित केला त्यांनी राष्ट्रवादीचे विश्वनाथ प्रभाकर राठोड यांचा 623 मतांनी पराभव केला. विश्वनाथ राठोड यांना 6240 मते पडले.
*सावंगी (म्हा) जिल्हा परिषद गट*:: सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे अनुसूचित जाती साठी असून या गटात भाजपच्या लता विजयकुमार वाकळे यांनी 7323 मते घेऊन विजय मिळवला त्यांनी राष्ट्रवादीच्या वनिता रामराव उबाळे यांचा 1465 मतांनी पराभव केला.

*आडगाव बाजार जिल्हा परिषद गट*:: या गटात भाजपचे डॉ.देवराव गंगाराम कऱ्हाळे यांनी तब्बल 8177 मध्ये घेऊन विजय संपादित केला. त्यांनी राष्ट्रवादीचे माधव रंगनाथ घोगरे यांचा 3682 मतांनी पराभव केला.या गटात वंचित बहुजन आघाडीचे गजानन भिवाजी कराळे यांनीही 668 मतदान घेऊन लक्ष वेधले.*

भोगाव जिल्हा परिषद गट*:: या गटात राष्ट्रवादीचे कृष्णकांत शिवाजीराव मोरे यांनी 8265 मते घेऊन भाजपच्या रवी बाबुराव मोरे यांचा 1937 मतांनी पराभव केला. रवी मोरे यांना 6328 मते पडली. या गटात वंचितच्या पार्वतीबाई रामजी बहिरट यांनी केवळ 183 मते घेतली.
जिंतूर पंचायत समितीच्या एकूण वीस जागापैकी भाजप 14 जागी विजयी तर राष्ट्रवादी सहा जागी विजयीपंचायत समिती गटातील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे कोक – सबजेफुला रंगनाथ वजीर (राष्ट्रवाद) वझर:- ममता मुरलीधर मते (राष्ट्रवादी) विजया संतोष ढोणे (भाजप) वाघी:- अयोध्या शंकर खिस्ते (भाजप) भोसी:-भास्कर रावसाहेब ठाकरे (भाजप),सावंगी म्हा:- धम्मपाल भीमराव प्रधान (भाजप) अंबरवाडी:-आशामती राजाभाऊ घुगे (भाजप) आडगाव बाजार:-अश्विनी बाळू दाभाडे (भाजप) इटोली:-रंजना बालाजी सांगळे (भाजप) भोगाव:-अमृता मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस) मानधनी:-सोनी महादेव दराडे (भाजप) वरुड:-परमेश्वर लक्ष्मण ठाकरे (भाजप) पुंगळा :-भगवान श्रीरंग जगताप (भाजप) चारठाणा:: तहसील जाफरमिया देशमुख (भाजप) जांब:- सुनिता विलास मस्के (राष्ट्रवादी काँग्रेस) बोरी:-कनकुटे लक्ष्मी राहुल (राष्ट्रवादी काँग्रेस) वर्णा:-सीमा रविराज अंभोरे (राष्ट्रवादी काँग्रेस) वसा:- सुनिता राजेंद्र नागरे भाजप दुधगाव:-माणिक साखरे (भाजप) कौसडी:-आवेश सय्यद रहमत सय्यद राष्ट्रवादी मीरा रामेश्वर वजीर (भाजप) आदी.
सुरेश नागरे यांना सोडचिठ्ठी देणारे नाना राऊत यांच्या पराजयाचा *”कैसा हराया”* हा अमृता नागरेंचा डायलॉग तुफान व्हायरल.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?