तथागत बुद्धांचा व भिक्कु संघाचा आशीर्वाद आ.मेघना बोर्डीकरांच्या पाठीशी—प्रा.जोगेंद्र कवाडे
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;
गौतम बुद्धाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न लोकार्पण सोहळ्यास भीम अनुयायांची अलोट गर्दी
जिंतूर (अजमत पठाण)-
आज सेलू तालुक्यातील आम्रवन महाविहार देवगाव फाटा येथे वर्षावास समाप्तीचे औचित्य साधून आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या स्वयं कल्पनेतून साकार झालेल्या तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा भव्य लोकार्पण सोहळा व धम्मदेशना कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रमास जिंतूर सेलू तालुक्यातील भीम अनुयायाची अलोट गर्दी उपस्थित होती.


या कार्यक्रमास लॉंग मोर्चाचे प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित अनुयायांना मोलाचे मार्गदर्शन करत तथागतांची शिकवण अंगीकारावी असे आवाहन करत उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. त्यांनी असे पुढे सांगितले की तथागत गौतम बुद्ध व उपस्थित भिक्कु संघाचा आशीर्वाद कायम आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या पाठीशी प्रत्येक कार्यात भरभरून राहील कारण त्यांच्या संकल्पनेतून हे घडलेले पावन कृत्य समाज कधीही विसरणार नाही.
आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना मुलगा मोलाचे मार्गदर्शन करत असे सांगितले की जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी तथागताची दया करुणा व शांती प्रत्येकांनी अंगीकारली पाहिजे राजकारण करतांना खुद्द वडिलांनी ग्रामीण भागात भावी पिढीस डॉ.बाबासाहेबांची प्रेरणा,ऊर्जा सर्वांना भेटावी म्हणून त्यांचे पुतळे देण्याचे काम मोठ्या प्रमानवर केले.तसेच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणेची सदैव आठवण ठेवत सर्व जातीधर्माना सोबत घेऊन सर्वांगीन विकास साधण्याचा प्रमानिक प्रयत्न केला.पूर्ण मतदारसंघात रेकॉर्डब्रेक विकास केला.तथागत गौतम बुद्धांची शिकवण दया,करुणा, शांती ही बहुमूल्य शिकवण प्रत्येकांनी आपले जीवन सुखी होण्यासाठी अंगिकरावी असे आव्हान आ.मेघना बोर्डीकांनी या वेळी केले. हा तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम म्हणजे प्रत्येकांच्या मनाला शांती देणारा व योग्य दिशा दाखवणारा कार्यक्रम आहे आणि हे माझ्या हातून घडले यात मी माझी धन्यता मानते.असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनीही आपल्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत आपल्या समाजाचा नेहमीच मोठा हातभार लागलेला आहे.यांची आठवण त्यांनी या कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केली. बापा पुढे लेकीचे कौतुक ऐकले जावे यापेक्षा मोठे भाग्य नाही असे मत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी यावेळी सांगताना आपल्या भावनिक भावना व्यक्त केल्या.शेवटची एकच राजकीय इच्छा राहिली जी मला कधी लाभली नाही आपल्या आशीर्वादाने दिदीला भक्कम साथ देत लेकीला मंत्री पद भेटावी ही अपेक्षा ठेवतो अशी भावनिक साद त्यांनी घातली. या कार्यक्रमास मंचावर भदंत शरणानंद महाथेरो भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, पूज्य.भदंत संघरत्न,या सह असंख्य भिक्कु संघ उपस्थित होता.तसेच मीनाताई बोर्डीकरसुरेश भुमरे सह आत्माराम पवार,भगवान वटाणे,रवी घुगे,लक्ष्मण बुधवंत,गोविंद थिटे,रमण तोष्णीवाल,गोविंद दायमा,सुनील भोंबे,सुनील मते,कैलास खंदारे,पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय वाकळे सुमेध सूर्यवंशी,गुणीरत्न वाकोडे,विजय खंदारे,संदेश भालेराव, मुकुंद काळे, प्रतिक खिल्लारे, भगवान साळवे,रवी किरण गजभारे, राहुल शिंदेअमोल वाघ,भगवान साळवे, युवराज घनसावध व येशील व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकासांना मोरे यांनी केले.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?