बोर्डीकर पोदार लर्न स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

जिंतुर (अजमत पठाण)
बोर्डीकर पोदार लर्न स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या अध्यक्ष सौ. भावनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाने, शाळेच्या मुख्याध्यापक अनन्या पाल मॅडम व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर संगीत विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विविध नृत्य सादर केले. त्यानंतर विविध विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी इरा खोमणे आणि काव्या जाधव यांनी केले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.