पाच कोटी 70 लाख निधीचे सी सी रस्ते व नाल्याचे विकास कामाचा शुभारंभ.
जिंतुर (अजमत पठाण):-
शहरातील नुरानी कॉलनी, संतोषी मातामंदिर परिसर, मौलाना आजाद कॉलनी, विलासराव देशमुख उर्दू शाळा समोरील रस्ता या परिसरातील विकास कामाचे उद्घाटन दि. 15/10/24 राजी मौलाना महेबूब यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व शिवसेना अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सईदखान यांच्या पुढाकाराने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक टीकाखान यांच्या प्रयत्नाने यश मिळाल्यामुळे सी सी रोड व नाल्यांचे 5 कोटी 70 लाख रु.निधीचे विकास कामांचे उद्घाटन मौलाना मेहेबूब व अज्जूबखान पठाण यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी माजी नगरसेवक टीकाखान,राजा वैष्णव,शेख शकील पत्रकार, सिराज सिद्दीकी पत्रकार,आयुबखान, सय्यद गौस, करीमभाई, सलीम अन्सारी, खालेद चाऊस, अजीज भाई मोसिन खान पठाण, खलील पटेल यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.