भोगाव देवी येथील जि.प.च्या उर्दू शाळेतील नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी.
राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांना दिले निवेदन.
जिंतूर (अजमत पठाण ):-
जिंतूर तालुक्यातील भोगाव (देवी) येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात यावीत अशी मागणी पालकांच्या वतीने राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी यांना एका कार्यक्रमात निवेदन देण्यात आले.

याबाबत माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील भोगाव (देवी) येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील आठवीपर्यंतच वर्ग सुरू असल्याने पुढील शिक्षणासाठी मुले व मुलींना तालुक्यांच्या ठिकाणी जावे लागत असल्याने सदरील नववी व दहावीचे उर्दू वर्ग सुरू करण्याची मागणी राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर या भोगाव देवी येथे आल्या होत्या.
त्यावेळी पालकांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले व उर्दू शाळेतील 106 विद्यार्थी असल्याचे निवेदनात म्हटले असून गावातच पुढील नववी व दहावीची शिक्षण नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जमील कुरेशी, भगवान देशमुख, गजानन देशमुख, हाकीम कुरेशी, मुस्तकीम कुरेशी, फिरोज शेख, मोशीन बेग, सय्यद करीम सय्यद उमर, आदी पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?