मतदान १० दिवसावर तरीही एकाही उमेदवाराला ठाम विजयाची खात्री वाटेना.
मराठा-ओबीसी वाद, महागाई, राजकारणात झालेली खिचडी.
जिंतूर (अजमत पठाण):-
अवघ्या दहा दिवसांवर राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहेत. यात जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे पहावयास भेटत आहे.

जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात आहेत लोकसभेला जसे वातावरण बनले होते तसे वातावरण तयार होताना यावेळेस पाहण्यास भेटत आहे. जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील एकही उमेदवार ठामपणे सांगू शकत नाही की या निवडणुकीत माझाच विजय होईल.
निवडणूक तोंडावर असताना सुद्धा कोणत्याच उमेदवाराबद्दल सकारात्मक वातावरण बनत नसल्यामुळे मतदारसंघात अनपेक्षित निकाल लागतो की काय असे चित्र निर्माण होऊ लागले आहे.

20 नोव्हेंबरला जिंतूर-सेलू विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अवघ्या दहा दिवसांवर निवडणूक आली असली तरी अद्यापही एका उमेदवारासाठी शंभर टक्के सकारात्मक वातावरण कुठेच दिसत नाही यामुळे सर्वच उमेदवार आता मतदारसंघात फिरताना दिसत आहेत.
येणाऱ्या आठ ते नऊ दिवसांत कशाप्रकारे सकारात्मक वातावरण बनवता येईल या अनुषंगाने आता सर्वच नेते तयारीला लागलेले दिसत आहेत.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?