अपघातग्रस्त पत्रकाराला मराठी पत्रकार संघातर्फे आर्थिक मदत.

जिंतूर (अजमत पठाण) :- जिंतूर शहरातील एक पत्रकार,वृत्तपत्र विक्रेता दुचाकीवरून जालण्यावरून जिंतूरकडे येत असताना रस्त्यात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला या अपघातात ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तालुका मराठी पत्रकार संघाकडून पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
बाबत अधिक माहिती अशी की शहरातील पत्रकार तथा वृत्तपत्र विक्रेते शेख निशाद अहमद हे कुटूंबिया सह दुचाकीवर बसून जालना येथून जिंतूरकडे येत होते रस्त्यात प्रिंप्रि (ड्रायव्हर) शिवारात गतिरोधकावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला.
या अपघातात पत्रकार निशाद यांच्या चेहऱ्याला मोठ्या प्रमाणात मार लागून चेहऱ्याची दोन हाडे मोडली तर पत्नी व मुलीला किरकोळ मार लागला होता त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चेहऱ्यावरील शस्त्रक्रियेसाठी जिल्ह्याच्या ठिकाणच्या एका खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आले.
त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने रोख पंचवीस हजार रुपायांची आर्थिक मदत करण्यात आली तसेच दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा काढलेल्या विम्याची रक्कम मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांना या वेळी देण्यात आलेया वेळी पत्रकार संघाचे मार्गदर्शक एम ए मजीद, शेख निहाल अहमद, शेख अहमद , सिराज सिद्दीकी,संघाचे अध्यक्ष शेख शकील अहमद, कार्याध्यक्ष बालाजी शिंदे, सचिव ज्ञानेश्वर रोकडे, शेख वाजीद, एम एजाज, शेख अलीम, महेश देशमुख, रियाज चाऊस, शेख अहमद, रामप्रसाद कंठाळे आदी पत्रकार उपस्थित होते