महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) मार्फत पदभरती बाबत आवाहन.

परभणी, दि. 17 : परभणी जिल्ह्यातील माजी सैनिक यांना सूचित करण्यात येते की महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, पुणे (मेस्को) मार्फत सुरक्षा रक्षक व अन्य पदांसाठी वारंवार जागा निघतात.
या जागा भरण्यासाठी माजी सैनिक (आर्मी, नेव्ही, एअरफोर्स) व (पॅरामिलीटरी फोर्स) यांच्याकरीता तरतूद करण्यात आली आहे. तरी इच्छुक माजी सैनिक व त्यांचे पाल्य, पत्नी, विधवा व पॅरामिलीटरी फोर्स यांनी पुढील मोबाईल क्रमांकावर साधावा.
म्हस्के पंडित सोपान (96074556060), मेस्को पर्यवेक्षक, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, परभणी, दूरध्वनी क्रमांक 02452-220340, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.