खा.फौजिया खान यांच्याकडून इटोली ग्रा.पं.ला घंटागाडीची भेट.

परभणी (अजमत पठाण):
राज्यसभेच्या सदस्या फौजिया खान यांनी आदर्श संसद ग्राम योजने अंतर्गत इटोली (तालुका जिंतूर) हे गाव दत्तक घेतले असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आधारित त्यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ग्रामपंचायतला घंटागाडीची भेट दिली आहे.
गावातील कचऱ्याचे व्यवस्थापन व्हावे तसेच गाव स्वच्छ व सुंदर दिसावे या दृष्टीने गावाला घंटागाडीची आवश्यकता होती. तशी मागणी गावातील सरपंच आणि नागरिकांनी खा.खान यांच्याकडे केली होती. या मागणीची पूर्तता करत दसऱ्याचे औचित्य साधून ग्रामपंचायतीला घंटागाडीची भेट खासदारांनी देऊ केली आहे.दिनांक 11 ऑक्टोबर रोजी खा.खान यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण झाले.
यावेळी तहसिन खान, विश्वंभर गावंडे, इटोली ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता जगदीशराव घुगे, उपसरपंच नवनाथ मेनकुदळे, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे, ग्राम विकास अधिकारी विश्वनाथ कांगणे, समाजशास्त्रज्ञ परमेश्वर हलगे, संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, पोलीस पाटील दत्ता लिंबाळकर, माणिक आव्हाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.आदर्श संसद ग्राम योजने अंतर्गत ग्रामपंचायत इटोली येथे खासदार फौजिया खान यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत दलित वस्ती सुधारणा व सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, डॉ. आंबेडकर चौक सुशोभीकरण, गोबर्धन प्रकल्प, सभामंडपाचे बांधकाम इत्यादी विकास कामे करण्यात आली आहेत.
गाव स्वच्छ व सुंदर व्हावा यासाठी गावाला घंटागाडीची भेट देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी देखील गाव स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा.-खा.फौजिया खान
खासदार महोदयांनी दिलेली घंटागाडीची भेट अनमोल असून यामुळे गावातील कचऱ्याचे व्यवस्थापन होण्यासाठी मदत होणार आहे.-शिवराज केंद्रेउपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद,परभणी