सायखेडा येथे भव्य शंकरपट स्पर्धा – ४ लाखांची जंगी लूट!मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन.
जिंतूर (अजमत पठाण): सायखेडा (ता. जिंतूर) येथे मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य शंकरपट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेत तब्बल ४ लाख रुपयांच्या जंगी बक्षिसांची लूट होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी मा.आ. गंगाधरजी बोर्डीकर (अंकुश) यांच्या हस्ते होणार असून, विशेष उपस्थिती म्हणून मा.आ. अमर राव कुंडलिक उपस्थित राहणार आहेत.मुख्य आकर्षण म्हणून दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य नागरी सत्कार सोहळा व जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर साहेब तसेच मा.आ. सारंगराजी वडकुते साहेब असून, त्यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडणार आहे.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. प्रताप देशमुख, मा.श्री. शंकरभाऊ पवार, मा.श्री. गोविंदभाऊ भोसले, मा.श्री. रामभाऊ चव्हाण, मा.श्री. नागनाथराव राजळे, तसेच स्थानिक आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


बक्षीस वितरण सोहळा मा.श्री. बाळासाहेब धुमाळ (माजी जिल्हा परिषद सदस्य) यांच्या हस्ते होणार असून, स्पर्धा अत्यंत थाटात पार पडणार आहे.🏆 प्रमुख बक्षिसे :पहिला क्रमांक – ₹७०,०००/-दुसरा क्रमांक – ₹५०,०००/-तिसरा क्रमांक – ₹३०,०००/-चौथा क्रमांक – ₹२०,०००/-पाचवा क्रमांक – ₹१०,०००/-तसेच छोटा गट व बक्षिस विभागातही हजारोंच्या बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन “जगन्नाथ नवबाळ मित्र मंडळ, सायखेडा” यांच्या वतीने करण्यात आले असून, नियोजक म्हणून “समस्त गावकरी मंडळी सायखेडा, बेलखेडा व अमरद” यांनी पुढाकार घेतला आहे.या शंकरपट स्पर्धेमुळे परिसरातील शेतकरी, पशुपालक, आणि शौकिनांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परभणी जिल्ह्यातील आणि शेजारच्या जिल्ह्यांतील नामांकित बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरणार आहे.
ठिकाण: सायखेडा ता. जिंतूर, जि. परभणी दिनांक: उद्घाटन – २४ ऑक्टोबर २०२५स्पर्धा व कार्यक्रम – २५ ऑक्टोबर २०२५📞 संपर्क: ९३७३५३५८८९ / ८९७५६२६९४४ / ९०७५२४४१४१.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?