एचएआरसी संस्थे तर्फे आज जिंतूर येथील 42 एकल पालक व अनाथ बालकांची दिवाळी गोड.
जिंतूर (अजमत पठाण):– मागील 14 वर्षापासून एचआयव्ही बाधित, अनाथ व वंचित व एकल पालक बालकांची दिवाळी आनंदात जावी यासाठी एचएआरसी संस्थे तर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून या वंचित मुलांना मदत केली जाते.
यंदाही होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) या संस्थेतर्फे दिवाळी दान महोत्सव 2024 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 23 ऑक्टोबर रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथे 42 अनाथ व निराधार मुला मुलींना दिवाळी किट चे वाटप गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले , प्राचार्य श्रीधर भोम्बे, डॉ योगेश दहिफळे, एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक , उपाध्यक्ष डॉ शैलेश मंत्री, राजेंद्र खापरे, प्रकाश डुबे आदी तालुक्यातील शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा जाम्ब तांडा, मालेगाव, भिलज, भोगाव देवी, केहाळ तांडा, अंबिकावाडी, पांगरी, पुंगळा, वडाळी, सांगलळेवाडी, सायखेडा, शेवडी, सावंगी म्हाळसा, मालेगाव तांडा, चांदज या शाळेतील 42 एकल पालक व अनाथ मुलांची निवड करून त्यांना दिवाळी किट चे वाटप करण्यात आले.

या दिवाळी किट मध्ये ५ प्रकारचे फराळ – फरसाण, शंकरपाळे, बाकरवडी, चकली, बालुशाई, मोती साबण, सुगंधी हेअर ऑइल, उटणे, टूथपेस्ट, टूथब्रश, कंगवा, ब्लॅंकेट, शेंगदाणे चिक्की, राजगिरा लाडू, पॉड्स पॉवडर, शॅम्पु, आदी साहित्य चा समावेश असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांनी दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कुयरेवार तर आभार प्रदर्शन केशव घुगे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश डुबे यांनी केले. गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, डॉ योगेश दहिफळे, श्रीधर भोम्बे, डॉ. पवन चांडक यांनी आपले मनोगत व्यक्त करून अशा उपक्रमातून संस्थेने समाजातील गरजू व अनाथ मुलांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी गजानन कुरे, अरुण सोनवणे, सुनील शंकरपाळे विकास कांबळे, राजश्री स्वामी, माधुरी खंडागळे आदी शिक्षक व पालकांचे सहकार्य लाभले.

प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?
नगराध्यक्षपदाचा “चेहरा” कोण ?
जिंतूरात शिवजयंती उत्साहात होणार साजरीसंभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची माहिती.
संविधान रक्षक सोमनाथ सुर्यवंशीचे मारेकरी पोलिसच -खासदार राहुल गांधी