जिंतुरात विजेच्या कडकडासह पावसाची जोरदार हजेरी,वादळी पावसामुळे विद्युत पुरवठा खोळंबला.
वादळी वाऱ्यात वृक्ष कोसळून वाहनांचे नुकसान.
जिंतूर (अजमत पठाण) जिंतूर येथे विजेच्या कडकडा सह जोरदार वादळी वारे व पाऊस कोसळल्याने महावितरणचे पोल व केबल टुतले शहरात सर्वत्र अंधार व अनेक ठिकाणी वृक्ष मोटार सायकल व ॲटो रिक्षा वर उन्मळून पडल्याने आर्थिक नुकसान झाले.

वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे सुद्धा नुकसान मोठ्या प्रमानात झाले. सध्या शहरासह सबंध तालुक्यात अवकाळी अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू झालेला असून रात्री आज नऊ वाजेपर्यंत शहरातली बीज गुल झालेली दिसून आले या सर्व प्रकरणामुळे महावितरणाचा गलथान कारभार समोर आलेला असून शहरवासी महावितरणाच्या या गलथान कारभारामुळे जाम वैतागले आहेत.

पावसाळ्यापूर्वीच महावितरणाची ही अवस्था असेल तर वर पावसाळ्यात वीस सेवा सुरळीत राहील का असा प्रश्न नागरिकापुढे उभा राहिलेला दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे रात्रीचा दररोज विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून या अंधाराचा फायदा घेऊन शहरात चोरटे सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाळ्यापूर्वीच महावितरण विभागाने शहरासह संबंध तालुक्यातील विद्युत यंत्रणा सुरळीत करून पुढे पावसाळ्यात विद्युत पुरवठा पळवणार नाही यासाठी लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी तुझ्या नागरिकांतून मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शहरातील दळण व्यवस्था कोसळली आहे.
आज जिंतूर शहरात साडेचार ते साडेपाच अशा एक तासात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली होती. या पावसात जोरदार वादळी वारे सुटल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी पावसासह विजेचा कडकडाट ही मोठ्या प्रमाणात दिसून आला यावर्षी पावसाळ्यापूर्वीच वीज अंगावर पडून तालुक्यातील पिपरी रोहीला येथील एका तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच आज तालुक्यातील आपुरी शिवारात एका शेतकऱ्यांचा वीज पडून पडून एक शेती उपयुक्त बैल दगावल्याने शेतकऱ्यांचे पेरणीपूर्वीच बैल दगावल्याने नुकसानग्रस्त शेतकरी हतबल झाला आहे.शेतकऱ्यास शासनाने तत्काळ आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?