जिंतुर – सेलू मतदार संघातील राजकीय हेतूने कमी केलेले 4000 मतदारांचे नावे तात्काळ मतदान यादीत समाविष्ट करा – मा.आ.विजयराव भांबळे
जिंतूर (अजमत पठाण):-
जिंतुर – सेलू मतदार संघातील राजकीय हेतूतून कमी केलेले 4000 मतदारांचे नावे तात्काळ मतदान यादीत समाविष्ट करा म्हणून मा.आ. विजयराव भांबळे साहेब व खां. संजयजी जाधव साहेब यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जिंतूर सेलू मतदार संघात ज्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले, त्या 4000 मतदारांची नावे भाजपच्या काही नेत्यांनी व कार्यकरत्यानी 7 नंबरचा फॉर्म परस्पर दाखल करून हेतुपरस्पर मतदार यादीतील नावे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ती नावे कमी करण्यात येऊ नये तसेच बाहेर राज्यातील व इतर जिल्ह्यातील रहिवाशी असणारे लोकांचे मतदार यादीत बोगस कागद पत्राच्या आधारे (जसे की उदा. आधार कार्ड, शिधापत्रिका, लाइटबिल खाडाखोड करून) मतदारांची नावे वाढविण्याचे काम सुरू आहे ती नावे वाढविण्यात येऊ नयेत.

महाविकास आघाडीच्या विचारांचे मतदारांची नावे कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात हयात असणाऱ्या मतदारांची नावे मयत यादीत टाकून नावे कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे आशा प्रकारचे प्रयत्न करण्यात येऊ नये तसेच सेलू व जितुर तालुक्यासह सेलू शहर व जिंतुर शहरात आशा प्रकारचे प्रयत्न करणे सुरू आहेत. वरील पातळीवर आशा प्रकारचे प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
सेलू जिंतुर मतदारसंघात शहरी व ग्रामीण भागात नावे कमी करण्याचा प्रयत्न होत आहे तो होऊ नये व बोगस नावे यादीत टाकण्यात येऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी अन्यथा महाविकास आघाडी जिंतूर-सेलू यांच्याकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा ईशारा एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी (निवडणूक) परभणी यांना देण्यात आला.
यावेळी खां.संजय (बंडू) जाधव, मा.आ.विजयराव भांबळे, विनायकराव पावडे, ई. उपस्थित होते.

जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.