जिंतूरात शिवजयंती उत्साहात होणार साजरीसंभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची माहिती.

जिंतूर (अजमत पठाण)
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रम राबवून 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याचे संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशात तसेच बाहेर देशात विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात येत असते यातूनच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जयंती साजरी करण्यात येणार आहे .
यामध्ये 18 फेब्रुवारी रोजी रात्री फटाक्यांची आतिषबाजी तर 19 फेब्रुवारी रोजी पुतळा परिसरात सकाळी 9 वाजता शिवजन्माचा पाळणा महिलांच्या वतीने घेण्यात येणार आहे तर सकाळी 10 वाजता अण्णा भाऊ साठे चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या मिरवणुकीत विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार असून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक पार पडणार आहे म्हणून शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे