जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
जिंतूर (अजमत पठाण): जिंतूर पोलिसांनी आज ७ नोव्हेंबर रोजी अवैध गुटखा साठ्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा तब्बल ₹२,७२,८५८/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन जिंतूर येथील सपोनि पांडुरंग पुंड, पो.हवा. १२६५ राठोड, पो.शि. २०७ धोंडे आणि मपोशि. १२२४ दुबे हे अधिकारी गुप्त बातमीदारामार्फत आलेल्या माहितीनुसार हद्दीतील पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, जफर पठाण रा. पठाण मोहल्ला, जिंतूर यांच्या घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याचा साठा आहे.
त्यानुसार पोलिसांनी शासकीय पंचासह आरोपीच्या घरी जाऊन रेड (धाड) केली असता, आरोपी पोलिसांना पाहताच घराच्या छतावरून पळून गेला. आरोपीच्या घराची तपासणी केली असता, विविध प्रकारच्या गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. हा सर्व साठा जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत ₹२,७२,८५८/- इतकी आहे.महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास घातक ठरणारा गुटखा प्रतिबंधित केला आहे.

या साठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली.ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक देवाशीष बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकात सपोनि पांडुरंग पुंड, सपोनि चव्हाण, पो.हवा. १२६५ राठोड, पो.हवा. ९६९ जाधव, पो.हवा. ८८ वाठोळे, पो.हवा. १२३३ वाघमारे, पो.शि. २०७ धोंडे, आणि मपोशि. १२२४ दुबे यांचा समावेश होता.पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास जिंतूर पोलीस करत आहेत.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 जाहीर —