जिंतूर सेलू विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी घेतला आढावा.
उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
जिंतूर (अजमत पठाण):-
जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्र 95 मध्ये येणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी दि. १८ ऑक्टोबर रोजी जिंतूर – सेलू येथील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी पदभार स्वीकारताच औंढा रोड वरील आयटीआय महाविद्यालय व तहसील परिसरात निवडणुकी च्या अनुषंगाने कामकाजाचा आढावा घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत दोन तास बैठक घेतली.

जिंतूर-सेलू उप विभागीय अधिकारी, तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रविण फुलारी यांनी पदभार दि.१८ आक्टोबर रोजी स्विकारताच त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेचा प्रशासकीय स्तरावरील तयारीचा पूर्ण आढावा घेतला.
यामध्ये औंढा रोड परिसरात असलेले आयटीआय महाविद्यालय परिसरातील मतमोजणी केंद्र,तसेच तहसील परिसरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी असलेल्या नियोजन, जिंतूर सेलू परिसरातील चेक पोस्ट तसेच वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांचा मतदान जास्तीत जास्ती कसे वाढवावे यांसह अनेक बाबींवर तब्बल दोन तास अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत घेतलीं.
तसेच या विधानसभेच्या निवडणुकीत २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्यास आपल्या बलाढ्य भारताची लोकशाही अधिक बळकट होईल.त्यामुळे सर्व मतदार नागरिकांनी मतदान अवश्य करावे तसेच माननीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
कोणीही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी नसता कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे हसत खेळत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करावी असे आवाहन केले.
यावेळेस उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी,जिंतूर तहसीलदार राजेश सरवदे, सेलू तहसिलदार डॉ.शिवाजी मगर,नायब तहसीलदार सुग्रीव मुंढे, नायब तहसीलदार,प्रशांत राखे यांच्यासह हनुमान बोरकर,रामेश्वर शिंदे, रुपेश वाहुळे, विश्वजीत खरात,अनिल आंबेराव इ.कर्मचारी उपस्थित होते.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?