लक्ष्मण बुधवंत यांची उपमुख्यमंत्री अजित पवार गट राष्ट्रवादी तालुका अध्यक्षपदी निवड.

जिंतूर—(अजमत पठाण)
जिंतूर येथील नेहमी अग्रेसर राहणारे श्री.संत भगवान बाबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत यांची उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पदी निवड झाली. या निवडीचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे.
या निवडीचे नियुक्ती पत्र खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना बहाल करण्यात आले. आज 23 मार्च रोजी झालेल्या नांदेड येथील एका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यक्रमात त्यांच्या निवडीची घोषणा झाली.जिंतूर तालुक्यातील लक्ष्मणराव बुधवंत हे एक सामाजिक चळवळीतील अग्रेसर असे नाव या पूर्वी त्यांनी भाजप तालुका अध्यक्ष पदाचीही जवाबदारी पूर्ण जबाबदारीने पार पाडल्याचे दिसून आले पण विधानसभा निवडणुकीनंतर काही कारणास्तव त्यांनी बोर्डीकर कुटुंबाशी दुरावा करत सुरेश नागरे गटात सामील झाले.

लक्ष्मण बुधवंत हे तालुक्यातील चळवळीतून वर आलेले एक नाव असून राजकारणा सह सामाजिक कार्याची जाण असलेले लक्ष्मण बुधवंत यांचा जिंतूर तालुक्यात राजकीय दबदबा दिसून येतो. राज्यात भाजप, शिंदे गट व अजितदादा गट असे त्रिकूट महायुतीचे सरकार आहे व भाजपच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशीही लक्ष्मणराव बुधवंत यांचे खूप जवळचे संबंध आहेत हे सर्वश्रुत आहे.
सामाजिक कार्याची सुरवाती पासून ओढ असल्याने त्यांनी श्री.संत भगवान बाबा संघटन उभे करत वंजारी समाज जिंतूर तालुक्यात मोठ्या प्रमानात असल्याने समाजबांधवांची एक मजबूत फळी त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसुन येते.वंजारी समाजासह सर्वचजातीधर्माशी त्यांचे सलोख्याचे सबंध लक्ष्मण बुधवंत जोपासून आहेत.
श्री.संत भगवानबाबा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शहरात शहरात ते दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमानावर साजरा करतात. प्रत्येक जातीधर्माच्या कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवत आपल्या राजकीय जीवनाचा प्रवास करतांना 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करणे त्यांच्या हातून घडलेल्या विविध सामाजिक व सांकृतिक कार्यक्रमातून दिसून येते.जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील रहिवाशी लक्ष्मणराव बुधवंत यांची स्थानिक राजकीय राजकारण त्यांची पकड मजबूत असल्याची प्रचिती ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी मातब्बर राजकीय प्रस्थापितांना दाखवलेली आहे हे विशेष.
तालुक्यातील शेवडी येथे समाजाचे श्रद्धास्थान श्री.संत भगवान बाबा यांचे सुसज्ज मंदिर उभारण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार विसरता येणार नाही. तालुक्यातील राजकारण परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर परिवार, शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे व नूकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित कडून निवडणूक रिंगणात उभे असलेले सुरेश नागरे यांची 50 हजाराच्या वर मतदान घेऊन आपली ओळख निर्माण केलेली आहे.
तालुक्यातील राजकीय झोतात पुढे आलेले नाव सुरेश नागरे हे पण सध्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटात सामील झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती सह नगर परिषद निवडणुकीत नूतन तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत आपला यशस्वी ठसा उमटवतील यात शंका नाही.