मतदार जनजागृतीसाठी तालुक्यात चित्रकला व रांगोळी स्पर्धा संपन्न
जिंतूर (अजमत पठाण-)
दिनांक 18, व 19, ऑक्टोबर रोजी जिंतूर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये चित्रकला व रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आले .

भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे, 95 जिंतूर निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार जिंतूर तथा 95 जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, तहसीलदार सेलू तथा 95 जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मगर, मतदार जनजागृती व सहभाग कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंडे यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू आहे.

नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी केलेल्या नियोजनानुसार 18, व 19, ऑक्टोबर रोजी तालुक्यातील सर्व शाळेमध्ये चित्रकला व रांगोळी स्पर्धा संपन्न झाल्या. निवडणूक साक्षरता समिती (ELC) स्थापन करणे किंवा स्थापन केलेल्या ELC मार्फत मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मतदार जनजागृती संदर्भातील “मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो….चला आपला देश घडवूया,सर्वांनी मतदान करूया….मतदान आमचा हक्क आहे,आम्ही तो बजावणार…. मतदान करा, मतदान करा….100% मतदान करा” या घोषवाक्यसह चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
एकूणच चित्रकला व रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मतदारांना असे आवाहन करण्यात आले की, उत्सव लोकशाहीचा, अभिमान देशाचा अशी भावना मनात ठेवून दिनांक 20/11/2024 रोजी सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे.
स्पर्धा आयोजनासाठी जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे, मंगेश नरवाडे, स्वीप सदस्य राजेंद्र ढाकणे, मयूर जोशी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी मेहनत घेतली.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?