संविधान रक्षक सोमनाथ सुर्यवंशीचे मारेकरी पोलिसच -खासदार राहुल गांधी
परभणी/प्रतिनिधी
संविधानाचे रक्षण करणार्या सोमनाथ सुर्यवंशी यास पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळेच न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला असून याला जबाबदार असलेल्यां दोषींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खा.गांधी हे सोमवारी (दि.23) दुपारी परभणीत आले होते. परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात झालेला भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान व सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खा.गांधी यांचा हा दौरा होता.


यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार प्रणिती शिंदे, खा.संजय जाधव, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी खा.तुकाराम रेंगे, माजी आ.यशोमती ठाकूर, आमदार डॉ.प्रज्ञा सातव, आ.डॉ.राहुल पाटील, आ.नितीन राऊत, आ.अमित देशमुख, माजी आ.सुरेश वरपूडकर, माजी आ.सुरेश देशमुख, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबिरे, बाळासाहेब देशमुख, अॅड.विजय गव्हाणे, भगवान वाघमारे, डॉ.विवेक नावंदर, रामभाऊ घाटगे, अनिल मोरे आदी उपस्थित होते.
खा.गांधी यांनी सांगितले की, मी आज सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्याचा शवविच्छेदन अहवाल, व्हिडिओ, छायाचित्रे बघितली. त्यावरून सोमनाथचा मृत्यू हा संपूर्णत: न्यायालयीन मृत्यू असल्याचे सांगत तो संविधानाचे रक्षण करणारा होता, असे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा भारतीय संविधानाच्या विरोधातील आहे. पोलिसांनी बेदम मारहाण करून सोमनाथची हत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला. या जे जे दोषी आहेत त्या सर्वांना शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?
नगराध्यक्षपदाचा “चेहरा” कोण ?
जिंतूरात शिवजयंती उत्साहात होणार साजरीसंभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची माहिती.
डिजिटल माध्यमातून मतदारांनी घेतली मतदान करण्याची शपथ.