तंटामुक्ती-व्यसनमुक्ती अभियानाला जिल्हयात सुरूवात.

परभणी/प्रतिनिधी
गंगाखेड तालुक्यातील इसाद येथे बुधवारी (दि.9) नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या हस्ते जिल्ह्यातील तंटामुक्ती व व्यसनमुक्ती अभियानाला सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक श्री. रविंद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी (पुर्णा) श्री समाधान पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अशोक घोरबांड, गंगाखेडचे पोलीस निरीक्षक श्री दिपककुमार वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 25 वर्षापुर्वी पोलीस उपमहानिरीक्षक श्री.उमाप हे पोलीस उप अधिक्षक म्हणून परभणी जिल्हयात कार्यरत असताना इसाद गावातील नवतरुणांसाठी तंटामुक्ती, व्यसनमुक्ती अभियानाची सुरूवात केली होती. आतापर्यंत इसाद येथील 15 जण पोलीस दलात व 25 जण हे सैनिकी सेवा करीत आहेत.
इसाद गावातील नवतरुणांनी समाजामध्ये आदर्श निर्माण केला आहे. श्री. उमाप यांनी या गावात दुर्गा उत्सव अनुषंगाने भेट देऊन नवतरुणांशी व गावक-यांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, व्यसनाचे अधिनतेमुळे स्वतःला व समाजाला परिणाम भोगावे लागतात. समाज त्यामुळे देशाधडीला लागत असतो.
मैदानाशी कायम नाते ठेवावे, गावातील छोटे-छोटे तंटे ग्रामसभेत मिटवावेत. गावात अवैध जुगार, अवैध दारु सारखे धंदे करणारांची खैर ठेवणार नाही. उपस्थित ग्रामस्थानी जुनी आठवण करुन स्मृतीला उजाळा दिला. या कार्यक्रमात महिलांनी मोठा सहभाग नोंदविला. यापुढे जिल्हयात याच धर्तीवर कार्यक्रम घेऊन तंटामुक्त, व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार आहे.
यावेळी इसाद तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विश्वनाथ भोसले, पोलीस पाटील श्री. अशोक भोसले, दुर्गा व्यसनमुक्त समिती अध्यक्षा श्रीमती ज्योती सातपुते, सरपंच, सदस्य रामप्रसाद सातपुते, प्रभाकर भोसले, रोहितदास सातपुते, नम्रता भोसले, वैशाली सातपुते, कुंता सातपुते, अर्चना भोसले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.