जिंतुर – सेलू मतदार संघातील राजकीय हेतूतून बनावट कागदा आधारे नाव समावेश करण्यात आले आहे .
जिंतूर(अजमत पठाण):-
जिंतुर – सेलू मतदार संघातील राजकीय हेतूतून केलेले ४००० मतदारांचे नावे बनावट कागदा आधारे नाव समाविष्ट करण्यात आले आहे भाजपचे तालुकाध्यक्ष गोविंद थिटे यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जिंतूर सेलू मतदार संघात ज्या ४००० मतदारांची नावे कार्यकरत्यानी ६ नंबरचा फॉर्म परस्पर दाखल करून हेतुपरस्पर मतदार यादीतील नावे जास्त करण्याचा प्रयत्न केला आहे. ती नावे कमी करण्यात यावे जिल्ह्यातील रहिवाशी असणारे लोकांचे मतदार यादीत बोगस कागद पत्राच्या आधारे (जसे की उदा. आधार कार्ड, शिधापत्रिका, लाइटबिल खाडाखोड करून) मतदारांची नावे वाढविण्याचे काम सुरू आहे. ती नावे वाढविण्यात येऊ नयेत.

शहानिशा करून ती नाव कमी करण्यात यावे यात असणाऱ्या मतदारांची नावे जितुर व सेलू तालुक्यासह शहरात आशा प्रकारचे प्रयत्न करणे सुरू आहेत. वरील पातळीवर आशा प्रकारचे प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. जिंतूर व सेलू मतदारसंघात शहरी व ग्रामीण भागात नावे येऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी.
जिंतूर-सेलू यांच्याकड लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार राजेश सरोदे कार्यालय जिंतूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गोविंद थिटे , माजी नगराध्यक्ष मुन्ना गोरे, वसंतराव नाईक, कासाबाई बुधवंत, रहेमान लाडले माजी नगरसेवक ई.उपस्थित होते.

जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.