काही भामट्या अपक्ष उमेदवारांची अवस्था म्हणजे अंगात नाही बळ, चिमटा काढून पळ!

गल्लीत ***** विचारेना आणि लागला आमदारकी लढवायला अशी चर्चा आहे!
चार लोकांना चहा पाजला तर आठवडाभर त्या हॉटेलकडे फिरकत नाही, अशांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केली आहे!
जिंतूर (अजमत पठाण):- “सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे वारे जोरात वाहत आहे. हे आमदारकीची निवडणूक आहे आणि आपली परिस्थिती नसताना थोडे लाडकी बहीण योजनेतून तर काही उसणवारी करून आणलेल्या पैशातून काही अपक्ष भावी आमदारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
समाजात चांगले परिवर्तन घडवायचे आहे हे कारण पुढे करून अनेक महाभागांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. हे या ठिकाणी सुजान वाचकांना सांगण्याची अजिबात गरज नाही. उमेदवाराचे नाव ऐकले की ते समजून जातात हा भ**** आहे की सज्जन! ज्यांनी कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतला की सुजान मतदारांनी समजून घ्यावे तो अर्ज मागे का घेण्यात आला दरम्यान या अनुषंगाने सोशल मीडियावर प्रचंड धुराळा उठला आहे.”
कधी नव्हे ते 2024 च्या विधानसभा निवडणुकीत गल्ली गल्लीतील उमेदवार आमदारकीसाठी विधानसभेच्या मैदानात उतरल्याचे पहावयास मिळत आहे. पक्षाचे तेवढेच, बंडखोरी तेवढेच आणि हौसे, गवशे आणि नवशे यांनी भरलेले अपक्ष अर्जही तेवढेच!
अशी परिस्थिती विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत असल्याचे विचित्र चित्र आहे.उमेदवारांची प्रचंड संख्या पाहून सरपंच पदाला तरी मान आहे एवढी आमदार पदाची प्रतिष्ठा धुडीला मिसळल्याचे दिसून येत आहे. असे वाटते की आमदारकीसाठी प्रत्येक गल्लीतून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.