कोक गावातील पाणी पिण्यास अयोग्य ; आरोग्य विभागाचा अहवालगावकऱ्यांमध्ये संताप
जिंतूर (अजमत पठाण):-
जिंतूर तालुक्यातील कोक गावातील नागरीकांना पुरवठा होणारे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने प्रसिद्ध केला आहे. जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, परभणी यांनी घेतलेल्या तपासणीत या गावातील पाण्यात जिवाणूंचा प्रादुर्भाव आढळल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुख्य अणुजीव शास्त्रज्ञ यांनी १७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या अहवालानुसार, गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यात कोलिफॉर्म जंतूंची उपस्थिती आढळली आहे. परिणामी हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे प्रमाणित झाले.या संदर्भात ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकांकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गावातील विहिरी व पाण्याचे स्त्रोत नियमित स्वच्छता व क्लोरीनीकरणानेच वापरावेत. अन्यथा पोटाचे विकार, अतिसार, उलटी, ताप यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.ग्रामस्थांनी तातडीने स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?