“विठ्ठला हाती घेऊ कोणता झेंडा”

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
जिंतुर (अजमत पठाण):-
जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचे वारे जोरदार वाहत असताना नुकत्याच पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीने जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार विजयराव भांबळे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.
आणि महायुती तर्फे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांचे नावावर शिक्का मोर्तब झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून मतदार संघात काँग्रेसचे तिकीट भेटणार असे म्हणणारे काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे यांचे नाव आतापर्यंत तरी घोषित झालेले नसून ते कोणत्या पक्षातून व अपक्ष निवडणूक लढवतील का आघाडी धर्म पाडतील व “विठ्ठला झेंडा कोणता घेऊ हाती” असा जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे.
मतदार संघात गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेस पक्षात अनेक नेते मंडळीचा पक्षप्रवेश झाला आहे. त्या नेते मंडळींना सुद्धा प्रश्न पडला आहे. सुरेश नागरे यांचे परभणी सारखे जिंतूर मध्ये निवडणूक निकाल तर होणार नाही ना अशी चर्चा सध्या रंगली आहे.