जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार कोण?
जिंतुर (अजमत पठाण)
राष्ट्रीय कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये गोंधळ सुरूच आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून कोणाला तिकीट मिळणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विजय भांबळे हे माजी आमदार आहेत, त्यामुळे त्यांची या विधानसभा मतदारसंघात मजबूत पकड आहे, तर महाविकास आघाडीचे प्रदेश सचिव सुरेश नागरे यांनी जोरदार सभा घेऊन आपली ताकद दाखवून सेलू विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

निवडणुका येताच ते विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळतात, अशी चर्चा विधानसभा मतदारसंघात रंगली आहे. सुरेश नागरे यांनी जमीनी स्तरावर कमी वेळ दिल्याचे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे. सुरेश नागरे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत परभणी विधानसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि तेथून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांनी जिंतूर विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी पत्नीची उमेदवारी दाखल केली होती, तेथेही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांची या विधानसभा मतदारसंघात मजबूत पकड असल्याने जिंतूर-सेलू मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट व राष्ट्रीय कांग्रेस पैकी कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळेल याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
2019 विधानसभेला जिंतूर -सेलु राष्ट्रवादी गटाचे विजय भांबळे यांना 113,196 मतदान(44.02%) मिळाले होते ते दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांचे अवघ्या 3717 मतांनी पराभव झाले होते. तर राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे यांनी परभणी विधानसभेतून 2019 ची विधानसभा निवडणूक अपक्ष लढविली असता त्यांना 18431(9.59%) इतके मते पडले होते ते या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर होते
आचार संहिता जाहीर झाल्यानंतर उमेदवारी वाटप झाल्यावर महाविकास आघाडीत आघाडी धर्म पाळला जाणार की दुसऱ्या पक्षातपक्ष प्रवेश होणार? हे देखील पहावे लागेल.

जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.