नगराध्यक्षपदाचा “चेहरा” कोण ?
जिंतूर (अजमत पठाण)
जिंतूर नगरपरिषद निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली तरी राजकीय वातावरण तापू लागलेले आहे. स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी प्रमुख पक्ष भाजप ,काँग्रेस, शिवसेना , (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि एआयएमआयएम यांनी नगराध्यक्ष पदासाठी योग्य लोकप्रिय आणि जिंकणारा चेहरा शोधण्याची मोहीम सुरू केली आहे.निवडणुकीसाठी काही स्वतंत्र उमेदवारांची तयारी गुपचूप सुरू आहे .
सोशल मीडियावर प्रचार मतदार सरु आहे सर्वेक्षणी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकामुळे जिंतूरात राजकीय तापमान वाढत आहे आगामी काही दिवसात प्रत्येक पक्षांचा नगराध्यक्षांचा चेहरा जाहीर होऊ शकतो भाजपाकडून माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांचे नाव फायनल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.तर शिवसेना (उबाठा) गटांची सुरेखा शेवाळे टाले ह्याही नगर अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची त्यांनी घोषित केले आहे तर 2017 च्या नगरपालिका निवडणुकीत इच्छुक असलेले काही उमेदवार बंड करण्याच्या तयारी दिसून येत आहेत.

भाजपकडून सक्रियपणे रणनीती आखणी
-सत्तेचा अनुभव आणि संघटन शक्ती यावर विश्वास ठेवत भाजपकडून विद्यमान माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख मागील निवडणुकीतील मतदारसंघाचा कल विकास कामांची यादी आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा या सर्वच घटकांचा विचार करून अंतिम उमेदवार ठरलं असल्याची संकेत मिळत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून नव्या उमेदवारांवर भर.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून जुन्या कार्यकर्त्यांचा अनुभव आणि तरुण कार्यकर्त्यांचे ऊर्जा यांचा समन्वय साधण्यावर भर देण्यात येत आहे. पक्षांच्या तालुका आणि जिल्हा पातळीवरील नेत्यादरम्यान उमेदवारांनी निवडणुकीसाठी बैठका सुरू आहेत. स्थानिक जनतेत विश्वासहार्य प्रतिमा असलेला आणि विकास कामांचा कार्यक्रम घेऊन पुढे येणारा राष्ट्रवादीचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून पुढे करण्याचा विचार आहे.
एमआयएम, मजलीस-ए-इंकलाबे मील्लत व शिवसेने सह कार्यकर्त्याची चाचपणी
शिवसेनेकडून जनतेची थेट संपर्क असणाऱ्या तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात असले तरी गाव पातळीवर बैठक आणि कार्यकर्त्याच्या मतांची नोंद घेतली जात आहे. तर शिवसेनेच्या जिल्हा संघटक सुरेखा शेवाळे टाले या मात्र कंबर कसून तयार दिसून येतात. तर याच निवडणुकीत एएमआयएम व मजलीस-ए-इंकलाबे मील्लत व आणखीनही मुस्लिम पार्टी आपला नवीन चेहरा निवडण्याच्या तयारीत दिसून येतात.
भारतीय जनता पक्षाकडून प्रताप देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून शिवसेना (उबाठा) सुरेखाताई शेवाळे टाले ह्या देखील तयारीत आहेत व राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सबिया बेगम कपिल फारुकी, बाळासाहेब भांबळे, इस्माईल पैलवान हे देखील इच्छुक आहे.तर यावेळेस मात्र जिंतूर नगरपालिकेसाठी काँग्रेसचे उमेदवार कोण ? अशीच चित्र दिसून येत आहे.

प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?
जिंतूरात शिवजयंती उत्साहात होणार साजरीसंभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची माहिती.
संविधान रक्षक सोमनाथ सुर्यवंशीचे मारेकरी पोलिसच -खासदार राहुल गांधी
डिजिटल माध्यमातून मतदारांनी घेतली मतदान करण्याची शपथ.