नोकरी लावतो म्हणून जिंतूरच्या पशुधन अधिकारी यांची लाचीची मागणी.
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 45;
पैसे न दिल्याने बाहेरील उमेदवारांची नियुक्ती आमदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू.
जिंतूर (अजमत पठाण):-
जिंतूर तालुक्यातील भोगाव (देवी) येथील मुख्यमंत्री युवा कार्यक्रम योजनेअंतर्गत नोकरी लावण्यासाठी तालुका पशुधन अधिकाऱ्यांची वरिष्ठांच्या नावावरती लाचेची मागणी केली असून अर्जदाराने पैसे न दिल्याने बाहेरगावचे उमेदवाराची नियुक्ती केल्याने अर्जदार यांनी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
जिंतूर तालुक्यातील भोगाव( देवी) येथील सुभाष देवीदासराव देशमुख यांनी दिलेले निवेदनात जिंतूर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पशुधन अधिकाऱ्यांनी नोकरीसाठी तीस हजार रुपये वरिष्ठांच्या नाव पुढे करून मागणी करण्यात आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की माझा मुलगा भागवत सुभाषराव देशमुख यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज केला होता व भोगाव देवी येथून एकाच अर्ज दाखल असल्याचे म्हटले असून त्यासाठी तुमच्या मुलाला नोकरी पाहिजे असल्यास पशुधन अधिकारी जिंतूर यांनी वरिष्ठयास वीस हजार रुपये तर मला दहा हजार रुपये देत असाल तरच तुमच्या मुलाला नोकरी देतो नसता आम्ही दुसऱ्याला घेऊ आमच्या साहेबांच्या हातात आहे. असे म्हणून पैसे न दिल्याने दुसरा उमेदवार दिला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यासाठी जिंतूर आमदार मेघना बोर्डीकर यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे या अगोदर निवेदनांच्या प्रति ग्रामविकास मंत्री, पशुधन विकास मंत्री, जिल्हाधिकारी परभणी, मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी, तहसीलदार जिंतुर, पोलीस स्टेशन जिंतूर, आमदार मेघना बोर्डीकर,माजी आमदार विजय भांबळे,गटविकास अधिकारी जिंतुर, आदींना देण्यात आल्याची म्हटले आहे

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?