घरासमोर युवकावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
जिंतूर | (अजमत पठाण)
जिंतूर शहरातील मौलाना आझाद कॉलनीत भरवस्तीत एका युवकावर चौघांनी संगनमत करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरासमोर झालेल्या या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमीन अब्दुल सत्तार लाखानी (वय ३३, व्यवसाय – चायनीज गाडी चालक, रा. मौलाना आझाद कॉलनी, जिंतूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख अरबाज शेख वाजीद, शेख सोहेल शेख तेजबाज, शेख तौफीक शेख नफीस आणि शेख जुबेर (सर्व रा. जिंतूर) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ४२१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, १८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता ते त्यांच्या घरासमोर असताना आरोपी तेथे आले. “माझ्या भावाची बदनामी का करतोस?” असा जाब विचारत आरोपींनी वाद घातला. त्यानंतर मुख्य आरोपीने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर, पाठीवर आणि पायावर वार करून गंभीर दुखापत केली. इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच, “आज जीवंत सोडतो, पुन्हा दिसलास तर ठार मारू,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे.
या हल्ल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी युवकावर उपचार करण्यात आले असून, त्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
जिंतूर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११८(२), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून हालचाली सुरू असून, या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास केला जात आहे.

जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.