वीज पडून एकाचा जागीच मृत्यू तर सहा जण जखमी.
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथे घटना दोन गंभीर
जिंतूर (अजमत पठाण):
जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथे ध्यान केंद्राचे बांधकाम चालू असतांना मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास अचानक वीज कोसळली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण जखमी झाले. यातील चौघांवर जिंतूर येथे उपचार सुरु आहेत.
दोघांची प्रकृती चिंताजनक जनक असल्यामुळे त्यांना परभणी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जिंतूर तालुक्यात पाचलेगाव येथे ध्यान केंद्राचे काम सुरु आहे. मंगळवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. वीज पडल्याने
इसराईल शेख गनी (वय ३५ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला.

तर या ठिकाणी काम करणारे साजीद खान मजीद खान, शेख जावेद शेख गनी, हे दोघेजण गंभीर जखमी असल्या मुळे यांना परभणी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. असलम खान ताहेर खान, शहेबाज अफजल पठाण, वाजीद खान पठाण, शेख मुख्तार शेख मोहमद हे चौघेजण जखमी झाले आहेत.
महसूल विभागाने पंचनामा केला. पाचलेगाव येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राजेश सरोदे यांच्या आदेशावरुन मंडळ अधिकारी मोहसीन पठाण, तलाठी सुनिल झिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
घटनेनंतर मयत व जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी मोठा जमाव जमा काला, उपविभागीय पोलिस अधिक्कारी जीवन बेनीवाल, पो. नि. बुध्दीराज सुकाळे यांनी ग्रामीण रुखणालयात जाऊन जखमीची विचारपुस केली. जमावाला रुग्णालयाबाहेर काढले.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?