विरोधकांनी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात येऊन निवडणूक लढावी मतदारांचा हक्क हिरावून घेऊ नये – मा.आ.विजय भांबळे
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["default"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
भारतीय जनता पक्षाचे आमदार मेघना बोर्डीकर यांना धक्का तालुका अध्यक्ष ऍड. विनोद राठोड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
जिंतूर (अजमत पठाण):- मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांनी दि.19 ऑक्टोबर 2024 शनिवार रोजी सकाळी 11.30 वा त्यांच्या राहत्या घरी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी भाजपचे जिंतूरचे तालुका अध्यक्ष ऍड.विनोद राठोड यांनी भाजप जिंतूर तालुका अध्यक्ष पदाचा स्वखुशीने राजीनामा देऊन मा. आ. विजयराव भांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गट जिंतूर पक्षात जाहीर प्रवेश केला.

भाजप पक्षाची ध्येयधोरणे व नेतृत्वाला कंटाळून समाजहितासाठी आपण माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केल्याचे स्पष्ट मत ऍड. विनोद राठोड यांनी व्यक्त केले. तर ऍड. विनोद राठोड यांचे यावेळी पक्षाचा रुमाल व हार घालून पक्षात मा आ विजयराव भांबळे यांनी स्वागत केले. यापक्ष प्रवेशामुळे भाजपला जिंतूर तालुक्यात मोठे खिंडार पडले असून विद्यमान आमदार यांना मोठा धक्का बसनार आहे.
तसेच यावेळी पत्रकार परिषदेमध्ये भाजपचा आयटी सेल बाहेर राज्यातील अनेक मतदारांची नावे विविध बुथवर खोटे कागदपत्र जसे आधार कार्डावर पत्त्यामध्ये खाडाखोड करून नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याकरिता नावे टाकत आहेत व जिंतूर सेलू मतदारसंघातील महाविकास आघाडीचे मतदार यांचा परस्पर सहा नंबरचा फार्म भरून अनेक लोकांची नावे मतदारसंघाच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे मा.आ.विजयराव भांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी मा. खा.संजय जाधव साहेब यांच्या समवेत भेट घेऊन असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवेदन देखील दिले आहे व यापुढे देखील असा प्रकार चालूच राहिला तर जिल्हाधिकारी परभणी यांच्या दालनात लाखो मतदार घेऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
विरोधकांनी असा मतदारांच्या हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करून रंडीचा डाव खेळू नये तर याउलट प्रत्यक्ष निवडणुकीत निवडणूक लढवावी असे आवाहन देखील केले. ऍड. विनोद राठोड यांनी आपल्या पक्षात प्रवेश करून आपण भाजपला मोठा धक्का दिला आहे असा प्रश्न विचारला असता यापुढे देखील लवकरच मोठमोठे धक्के देणार असल्याचे मा आ विजयराव भांबळे यांनी स्पष्ट केले व व मतदार यांनी एड विनोद राठोड यांनी सत्तेत असणारा भाजप पक्ष का सोडला यावर जनतेने शहानिशा करावी असे नागरिकांना आवाहन केले.
यावेळी अशोकराव चोधरी, अजयराव चोधरी, विश्वनाथ राठोड, रामराव उबाळे, बाळासाहेब भांबळे, गणेशराव ईलग, शौकत लाला, गजानन कांगणे, दलमिर पठाण, संजय निकाळजे,कैलास महाराज, विजय खिस्ते, प्रवीण चव्हाण, प्रकाश काका भांबळे, शंकर गंजे, खालेक भाई, अक्कु लाला, हकीम लाला, गंगाधर तरटे, कैलासराव सांगळे, शरदराव अंभोरे,संजयराव अंभोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?