जिंतूर तालुक्यातील बोरी येथील मतदान केंद्राची जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी केली तपासणी.
जिंतूर (अजमत पठाण):-
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे जिल्हा परिषद शाळेमधील संकुलामध्ये व बोरी मधील एकूण 14 मतदान केंद्रांची तपासणी आज दिनांक 23 10 2024 रोजी करण्यात आली. यामध्ये बोरीमध्ये बुथ क्रमांक 281 या अतिशय संवेदनाशील केंद्राची विशेषतः वरील पथकाकडून पाहणी करून त्याचा blo यांच्याकडून आढावा घेण्यात आला.
येणारी निवडणूक अतिशय शांततापूर्ण व निवडणूक आयोगाने घालून दिलेले निर्देशानुसार पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज राहील याकरता सर्व मतदान केंद्र सज्ज असून प्रशासनही तयार आहे. सर्व नागरिकांनी होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करून निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वतःहून पुढे येऊन प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी परभणी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक ,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार ,नायब तहसीलदार ,पोलीस निरीक्षक व इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

जिंतूर शहरात गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार!
घरासमोर युवकावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे