जिंतूरमधून भाजपतर्फे मेघना बोर्डीकर तर गंगाखेडातून रासपतर्फे रत्नाकर गुट्टे यांनी भरला उमेदवारी अर्ज.
जिंतूर (अजमत पठाण):-
उमेदवारी दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 9 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र केले दाखल. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झालेली असून दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. 23) जिल्ह्यातील चार मतदारसंघात एकूण 9 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
यात जिंतूर मतदारसंघातून मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी भारतीय जनता पक्षातर्फे तर गंगाखेड मतदारसंघातून रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ – 6 उमेदवारांनी 6 अर्ज घेतले. तर ज्ञानेश्वर देविदास राठोड (अपक्ष), ज्ञानेश्वर नुरा राठोड (अपक्ष), अच्युत लिंबाजी कदम (अपक्ष), विजय अण्णासाहेब ठोंबरे (अपक्ष), मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर (भारतीय जनता पार्टी), विनोद दत्तात्रय भवाळे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

96- परभणी विधानसभा मतदारसंघ – 25 उमेदवारांनी 46 अर्ज घेतले. 97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ – 32 उमेदवारांनी 50 अर्ज घेतले. तर रत्नाकर माणिकराव गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. 98- पाथरी विधानसभा मतदारसंघ – 20 उमेदवारांनी 48 अर्ज घेतले तर भास्कर रामकिसन बेदरे (अपक्ष) व त्रिंबक देविदास पवार (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?