95-जिंतूर मतदार संघात निवडणुकसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण पूर्ण.
जिंतूर (अजमत पठाण):-
आज दिनांक 09 -11- 2024 रोजी दोनसत्रा मध्ये सकाळी 9 ते 1 पहिले सत्र व दुपारी 2 ते 6 दुसरे सत्र याप्रमाणे निवडणुकीकरिता नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण पूर्ण झाले. हे प्रशिक्षण गायत्री लॉन्स ,शासकीय तंत्रनिकेतनच्या बाजूला औंढा रोड, जिंतूर या ठिकाणी पूर्ण झाले.
यानंतरचे तीसरे प्रशिक्षण दिनांक 19- 11- 2024 रोजी असणार आहे. या दुसऱ्या प्रशिक्षणामध्ये एकूण 1 ते 18 याप्रमाणे टेबल असून त्यापैकी टेबल क्रमांक 1 ते 16 या प्रत्येक टेबलवर 2 तलाठी याप्रमाणे 02 जणांची टीम निवडणुकी करता आलेल्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्याकरिता होती. टेबल क्रमांक 17 हा वरील 1 ते 16 टेबलवर हजेरी घेण्याकरता नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी होता.

तर टेबल क्रमांक 18 हा टेबल क्रमांक 1 ते 16 वर असलेल्या कर्मचाऱ्यांना हजेरीपट देणे , मतदान केंद्राध्यक्षांना माहिती पुस्तिका व इतर निवडणुकीसाठी अनुषंगिक साहित्य वाटप करण्यासाठीचा होता. याशिवाय इतर राखीवही कर्मचारी होते.
सदर प्रशिक्षणामध्ये उपविभागीय अधिकारी श्री.प्रवीण फुलारी व तहसीलदार श्री.राजेश सरवदे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने योग्य मार्गदर्शन करून उपस्थित कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसनही केले.

येणारे निवडणूक ही शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी तयार रहा अशा सूचनाही केल्या. मतदानाचा दिवस (polling day)हा लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा दिवस असून आपण स्वतःही मतदान करून इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
सदर प्रशिक्षण संपल्यानंतर विद्याव्हॅली इंग्लिश स्कूल या ठिकाणी हँडस ऑन ट्रेनिंग सुद्धा प्रत्यक्षरीत्या देण्यात आले. या ठिकाणी विशेषतः झोनल अधिकारी,मास्टर ट्रेनर व निवडणुकीकरिता नेमण्यात आलेले कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. विद्याव्हॅली या ठिकाणी हँडसऑन ट्रेनिंग नंतर निवडणुकीकरिता नियुक्त कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान सुद्धा घेण्यात आले.
येथे निवडणुकीकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सकाळी अल्पोपहार नाष्टा,दुपारी जेवण व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर प्रशिक्षणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्री.प्रवीण फुलारी,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्री.राजेश सरवदे,तहसीलदार श्री.शिवाजी मगर,नायब तहसीलदार श्री. सुग्रीव मुंढे याव्यतिरिक्त इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. अशी माहिती प्रसारमाध्यम व मीडिया सेल चे प्रमुख श्री.हनुमान बोरकर व श्री. रामेश्वर शिंदे यांनी दिली.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?