पत्रकार शेख शकील यांना राज्यस्तरीय पुरस्कार घोषित.
जिंतूर (अजमत पठाण):-
तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दै पुण्य नगरीचे तालुका प्रतिनिधी शेख शकील अहमद यांना समता साहित्य अकादमी यवतमाळ तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाला असून मान्यवरांच्या उपस्थितीत दि 21 डिसेंबर रोजी मुबईत प्रदान करण्यात येणार आहे
समता साहित्य अकादमी तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते या वर्षी उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार शहरातील दै पुण्य नगरीचे पत्रकार शेख शकील अहमद (बबलू पत्रकार) यांना जाहीर झाला असून या पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत दि 21 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, मार्गदर्शकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


जिंतूर पोलिसांचा मोठा धडाका; कत्तलीच्या संशयाने ७ बैलांची सुटका, ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त”
जिंतूर शहरात गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार!
घरासमोर युवकावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज