जिंतूर पोलीस महामार्गतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान अंतर्गत जनजागृती
जिंतूर (अजमत पठाण):-
जिंतूर येथील एकलव्य बाल विद्यामंदिर शाळेमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. वाहतुकीचे नियम सांगून वाहनावरील जुने दंड भरून घेणेबाबत कळवून तसेच हेल्मेट वापरण्याचे फायदे तसेच सीट बेल्ट वापरणे दारू पिवून वाहन चालू नये. तसेच वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये आदी माहिती दिली.
अपघात न होण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच अपघातग्रस्तांना मदत करने मदत केल्यास तुम्हाला पोलीसांन कडून कोणतीही अडचण येणार नाही तसेच अपघात संबंधाने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशा बाबत शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तसेच पालक यांना माहिती दिली या वेळी इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थी हजर होते तसेच या वेळी पोलीस उपनिरीक्षक कदम, अंमलदार काळे/1326 व पीसी/256 गिराम, पो.शी. जोधळे, पो.शी.पारखे आदी उपस्थित होते.


जिंतूर पोलिसांचा मोठा धडाका; कत्तलीच्या संशयाने ७ बैलांची सुटका, ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त”
जिंतूर शहरात गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार!
घरासमोर युवकावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज