माजी जि.प.अध्यक्ष प्रसाद बुधवंत, बालाजी सांगळे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
जिंतूर (अजमत पठाण):- राष्ट्रहिताची विचारधारा बाळगत व प्रगतीचा दृढ विश्वास बांधून देशात प्रगतीची वाटचाल करीत असलेल्या भाजपमध्ये अन्य पक्ष्याच्या पादाधिकारांचा भाजप मध्ये मोठ्या प्रमानावर प्रवेश होताना दिसून येत आहे.

आज मुबंई येथे भाजप राज्य प्रभारी रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर तालुक्यातील जि. प.अध्यक्ष प्रसाद बुधवंत, बालाजी सांगळे अनंतराव देशमुख, सरपंच गजानन कांगने,सह माजी आमदार सीताराम घनदाट,सुरेश फड,सरपंच रमेश गीते,जगन्नाथ गीते,पांडुरराव घुले,प्रा.संजय दराडे,आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.
आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष वैजनाथ बोराडे, माजी नगराध्यक्ष नितीन राठोड, माजी नगरसेवक नितीन राठोड, विकास सूर्यवंशी यांच्या सह माजी 10 नगरसेवकांनी सुद्धा या वेळी भाजप मध्ये जाहीर प्रवेश घेतला. या सर्वांचे भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले.या वेळी सुरेश भुमरे यांचीही उपस्थिती होती.


अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?