शासकीय यंत्रणा ढेपाळली: नगर पालिका, महावितरण, तहसील,पंचायत समिती, पोलीस प्रशासन आदींची सेवा कासव गतीने
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
जनता दरबार भरावा-नागरिकांचे प्रश्न सोडवा
अशासकीय विविध कमेट्या नसल्याने प्रशासकीय यंत्रणा सुस्तावली.
जिंतूर (अजमत पठाण):– खूप कालावधी नंतर मतदार संघात कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या रूपाने राज्यमंत्रीपद लाभलेले आहे. सहाजिकच मोठ्या तपानंतर मतदार संघास मंत्रीपद भेटल्याने लोकांच्या अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत.

वेळोवेळी राज्याच्या राज्यमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी नागरिकांचे प्रश्न समजतात त्यांनी वेळोवेळी ज्या त्या विभाग प्रमुखांना सूचना देऊन मी संबंधित प्रशासकीय यंत्रणा अपेक्षेप्रमाणे कामे करताना दिसून येत नाही. असे चित्र सध्या मतदारसंघात स्पष्ट होताना दिसून येत आहे.
थोडा मागवा घेतला तर काही बाबी स्पष्ट जाणवतात की पावसाळा सुरू होण्यापूर्वीच स्थानिक बालिका प्रशासनाने शहरातील सर्व प्रभागातील नाल्या साफ करणे अपेक्षित होते पण तसे होताना दिसून आलेले नाही कारण यापूर्वी पाडलेल्या अवकाळी पावसाने नाल्या न काढल्यामुळे नाल्यातील कचरा रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधीयुक्त पाणी घरात घुसल्याचे विदारक चित्र पावसाळ्या पूर्वीच पहावयास भेटले.

तसेच काही दिवस पिवळ्या रंगाचे दुर्गंधीयुक्त पिण्याचे पाणी नळाला आल्याने शहरात जुलाब,उलटी व पोटदुखीचे रुग्णांची रीघ ग्रामीण रुग्णालयात लागली होती. पालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, नागरिकांच्या मूलभूत गरजा पालिकेच्या माध्यमातून पूर्ण व्हाव्या म्हणून मंत्री मेघना बोर्डीकरांनी आवर्जून नेमिनाथ दंडवते यांच्या सारख्या कुशल प्रशासक मुख्याधिकारी रुजू करून घेतले.
पण अद्याप त्यांची पण पूर्ण विकास कामावर पकड मजबूत झालेली दिसून येत नाही.त्यांच्या शिस्तीच्या कामास स्थानिकांचा हवा तेवढा प्रतिसाद भेटताना दिसून येत नाही.रस्ता रुंदीकरण, अतिक्रमण आदी बाबत पालिका कासावगतीने काम करतांना दिसून येत आहे.

या पूर्वी अचानक आलेल्या वादळी वाऱ्या मुळे सबंध शहरातील विद्युत सेवा पूर्णतः कोलमडली होती. महावितरणच्या गलथान कारभारा मुळे शहरवाशियाना कित्येक दिवस अंधारात काढावे लागले. ऊर्जामंत्र्याच्या मतदारसंघात हे अपेक्षित नसल्याचे खडेबोल नागरिक करत होते.
नगरपालिका, महावितरण सह पोलीस प्रशासन असून नसल्यास जमा आहे कारण शहरात आठ ते दहा ते दरोडेखोराचे टोळके धुमाकूळ घालत असल्याचा सीसीटीव्ही फुटेज पुढे आलेला असून अद्यापही या दरोडेखोरांचा सुगावा स्थानिक पोलिसांना लागत नसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
कित्येक वसाहतीत नागरिकांनी रात्रपाळी करत जागरण सुरू केले आहे.नुकतेच काँग्रेस पक्षा तर्फे असेही निवेदन पोलिसांना दिले की पोलीस दरोडेखोरांना पकडू शकत नसतील तर आम्हाला स्वरक्षणा साठी शत्र परवाने द्या. ही मागणी सध्याची वेळ पाहता रास्त असल्याचे सुजाण नागरिक बोलत आहेत.

कारण काही वर्षा पूर्वी शिवाजीनगर वसाहतीमध्ये सुपारकर पती-पत्नीचा दरोडेखोरांनी तलवारीचा वार करून व माणूस पणे पती-पत्नी ठार केले होते हे जिंतूर शहर कधीही विसरू शकत नाही तेव्हा पोलीस प्रशासनाने आमच्याकडे पोलीस यंत्रणा कमी आहे ही बाब वेळोवेळी पुढे न ठेवता शहरातील नागरिकांच्या जीवताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
दूषित पाणीपुरवठ्यामुळे जिंतूर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून एका नागरिकाने दि .२० जून रोजी आपल्या पत्नीस दूषित पाण्यामुळे अतिसार झाल्यामुळे जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता कार्यरत डॉक्टरांनी बेड अवेलेबल नसल्याचे सांगून रुग्णासोबत उद्धट भाषा वापरत असल्याचे निदर्शनास आले. याबद्दल स्वदेशी न्यूजने याची विचारणा केली असता त्यांनी पत्रकारांस उद्धटपणे बोलून उडवा उडवीचे उत्तरे दिले.
आरोग्य राज्यमंत्र्याच्या मतदार संघात नगरपालिका कडुन होणारे दूषित पाणीपुरवठा व शासकीय ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या आडमुठीमुळे हे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले असून वैद्यकीय अधिकारी यांचे जिंतूर शासकीय ग्रामीण रुग्णालयावर कोणत्या प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत असून आरोग्य मंत्री तथा मतदारसंघाचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
पालिकेत गोरगरिबांची घरकुल योजना थंड बसत्यात दिसून येत आहे. मतदार संघात अद्यापही उद्योगधंदे नसल्याने हाताला कोणतेही काम नाही परिणामी तालुक्यातील बहुतांश कुटूंब संजय गांधी निराधार, कुटूंब अर्थ साह्य वर्धापकाळ आदी योजने वर कुटुंबाचा आर्थिक गाडा हाकतात पण तहसील प्रशासनाने वंचित ठेवल्याने कित्येक पात्र लाभार्थी अनुदाना साठी चकरा मारताना दिसत आहेत.
पंचायत समिती मध्ये सुद्धा सर्व दलालांचा सुळसुळाट असून कुठेही चिरीमिरी दिल्या शिवाय शासकीय काम होत नाही.यावर कोणाचाही अंकुश राहिलेला दिसून येत नाही.गंभीर बाब म्हणजे महायुतीचे सरकार येऊन बराच कालावधी झालेला असून पण दुर्दैवाने या सरकारकडून किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी कडून कुठल्याही अशासकीय कमिट्या कार्यकर्त्यांना अद्याप बहाल केलेल्या नसल्याने प्रशासकीय यंत्रणा सुस्तावली असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

प्रशासकीय यंत्रणेवर कोणाचाही अंकुश नाही असे स्पष्ट जाणवत आहे.सध्या राज्यात वाळू विक्री बंद असल्याने वाळू अभावी घरकुल योजना अडचणीत सापडली असून बांधकाम साठी वाळू अवाच्या सव्वा भावाने विकत घेण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकावर आलेली आहे.

तसेच वाळू विक्री बंद असल्याने बांधकाम मजूरास कोणतेही हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे राज्यमंत्र्यांनी यासाठी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण बहुतांशी वर्ग बांधकाम मजुरीवर आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो हे वास्तविक सत्य तालुक्यात आहे.
तेव्हा आपल्या जिल्ह्याच्या कार्यसम्राट व कर्तव्यदक्ष पालकमंत्री व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी लवकरात लवकर सर्व विभाग प्रमुख यांची बैठक घेऊन जनता दरबार भरवावा व स्थानिकांचे प्रश्न सोडवावे अशी माफक मागणी नागरिक पासून होताना दिसून येत आहे.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?