माजी आमदार विजय भांबळे उद्या राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटात प्रवेश करणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भांबळे यांचा प्रवेश महत्वपूर्ण ठरणार
जिंतूर (अजमत पठाण): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील माजी आमदार विजय भांबळे हे मंगळवार 1 जूलै रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटात प्रवेश करणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून भांबळे यांच्या या पक्षांतराबद्दल राजकीय वर्तूळात मोठी चर्चा सुरु होती.परंतु,भांबळे यांनी या पक्षांतराच्या चर्चेबद्दल ओळीनेसुध्दा खुलासा केला नाही,दुजोरा दिला नाही,किंवा खंडनही केले नाही.
त्यामुळे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज ना उद्या निश्चितच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश करणार, हे हळूहळू स्पष्ट होवू लागले होते. त्यांचे समर्थक कार्यकर्तेसुध्दा या संदर्भात दुजोरा देऊ लागले होते.
गेल्या महिन्यातच या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पक्षांतर सोहळ्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री पवार हे पाथरीत येणार, असे जवळपास निश्चित होते. परंतु,उपमुख्यमंत्री पवार यांचा तो दौरा लांबणीवर पडला. तो आता अनिश्चिततेच्या भोवर्यात आहे.
त्यामुळे दुर्राणी यांचा पक्षप्रवेश रखडला. परंतु, दुर्राणी यांच्या पाठोपाठ भांबळेसुध्दा उपमुख्यमंत्री पवार यांच्या दुसर्या दौर्यात जिंतूरात जोरदार शक्तीप्रदर्शन करीत राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटात सहभागी होतील, अशीही चर्चा सुरु झाली. मात्र त्यास दुजोरा मिळाला नाही.
सोमवारपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांचा किमान पंधरा दिवस परभणी जिल्हा दौरा होणार नाही, हे चित्र आहे. त्यामुळेच माजी आमदार भांबळे यांनी पक्षीय पातळीवरील वरिष्ठांबरोबर चर्चा करीत उपमुख्यमंत्री पवार यांच्या साक्षीने मुंबईतच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती हाती आली आहे.
या संदर्भात माजी आमदार भांबळे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल सायंकाळी उशीरापर्यंत नॉट रिचेबल होता. परंतु, राष्ट्रवादी अंतर्गत श्रेष्ठींनी भांबळे यांचा मुंबईत राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटातील प्रवेशास दुजोरा दिला.


अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?