जिंतूर तालुक्यातील इटोली, शिवारात एका युवतीवर सामुहिक बलात्काराची झाल्याची घटना;
जिंतूर (अजमत पठाण ) :- जिंतूर तालुक्यातील भोगाव (जि. परभणी) येथील एका तरुणी च्या तक्रारीवरून पोलिसांनी खंडणी मागणे, विनयभंग करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर गुन्हे केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी फिर्यादीकडे ५००० रुपये खंडणीची मागणी करून तिला आरोपीनी जबरदस्तीने इच्छेविरुद्ध शारीरिक संभोग सुद्धाकेला , असे फिर्यादीत म्हटले आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ अक्टोबर रोजी भोगाव देवी संस्थान इटोली येथील झडाखाली येथे ही घटना घडली.
याप्रकरणी, भोगाव येथील रहिवासी असलेल्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक १) अर्जुन दत्तादाव बटकुळे व आरोपी क्रमांक २) शे. साबेद शे. सत्तार यांनी एकत्र येऊन फिर्यादीचा विनयभंग केला. तसेच, आरोपी क्रमांक १) आणि ४)यांनी फिर्यादी सोबत अश्लील संभाषण केले आणि आरोपी क्रमांक ३) शे. साबेर शे. सत्तार व अन्य आरोपींनी फिर्यादीचे अश्लील व्हिडिओ काढले.

या व्हिडिओंच्या आधारे, आरोपी क्रमांक ५) आणि अज्ञात आरोपींनी फिर्यादीकडे ब्लॅकमेल करून ५००० रुपये खंडणीची मागणी केली. या प्रकारामुळे फिर्यादीस मानसिक त्रास झाला.याप्रकरणी, भोगाव येथील पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस)२०२३ च्या कलम ७०(१) विनयभंग, अश्लील संभाषण आणि इतर संबंधित गुन्हे, १२६(१) अवैध अवरोध किंवा स्थानबद्धता, ३१० (खंडणी), आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०० च्या कलम ६६( ई ) माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल असलेल्या आरोपींची नावे: अर्जुन दत्तादाव बटकुळे – भोगाव, शे. साबेद शे. सत्तार – भोगाव, – भोगाव या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. कलम ७०(१), १२६(१) आणि ३१० हे भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलमा नुसार आणि खंडणीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच कलम ६६( ई ) माहिती तंत्रज्ञान नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?