शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर (अजमत पठाण): जिंतूर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना स्थानिक राजकारणात एक नवा वळण दिसून आला आहे.
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी निश्चित करण्यात होत असलेल्या टाळाटाळीमुळे अखेर सुरेखा शेवाळे-टाळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा शेवाळे-टाळे या गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना (उबाटा गट) सोबत कार्यरत असून त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला संपर्क असून, महिलांमध्येही त्यांची चांगली लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, शेवटच्या क्षणी पक्षाकडून उमेदवारीबाबत टाळाटाळ होत असल्याने त्यांनी स्वबळावर रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करताना त्यांच्या समर्थकांचा मोठा उत्साह दिसून आला. शहरातील महिलांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून “सुरेखाताई पुढे चला, आम्ही तुमच्यासोबत आहोत” अशा घोषणा दिल्या.
याबाबत बोलताना सुरेखा शेवाळे-टाळे म्हणाल्या, “मी पक्षासाठी मनापासून काम केले आहे. मात्र उमेदवारीबाबत अन्याय झाल्याने मी जनतेच्या आशीर्वादावर अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. माझी उमेदवारी ही जनतेच्या विश्वासाची आहे, पक्षाच्या तिकिटाची नव्हे.”या घटनाक्रमामुळे शिवसेना (उबाटा गट) च्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, नगराध्यक्ष पदासाठीच्या स्पर्धेत आता नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उमेदवारीसाठी पक्षाकडून टाळाटाळ झाल्याने अपक्ष म्हणून कार्यकर्त्यांचा व महिलांचा उत्साही प्रतिसाद.
“जनतेच्या आशीर्वादावर मी निवडणूक लढणार” — सुरेखा शेवाळे-टाळेशिवसेना उबाटा गटाच्या अंतर्गत गटबाजीला या निर्णयामुळे नवा वळण लागले आहेत.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?
नगराध्यक्षपदाचा “चेहरा” कोण ?