88 लाखांची दारू लंपास प्रकरणातील अटक आरोपींना जामीन मंजूर.
जिंतूर (अजमत पठाण):- बनावट अपघाताच्या माध्यमातून 88 लाख रुपयांची विदेशी दारू लंपास झाल्याचे प्रकरण जिंतूर तालुक्यात तथाकथितरित्या घडले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना, परभणी येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने दि. 18 ऑक्टोबर 2025 रोजी जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.
आरोपींच्या वतीने ॲड. सुनिल बुधवंत यांनी प्रभावी बाजू मांडली.या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, 31 ऑगस्ट 2025 रोजी नाशिक येथील मद्य कंपनीतून नांदेड येथील वाईन शॉप निघालेल्या ट्रकमध्ये (क्रमांक एमएच 15 जीव्ही 1735) 1 कोटी 39 लाख रुपयांची विदेशी दारू भरलेली होती.
जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे शिवारात ट्रकचा अपघात झाल्याचा बनाव करून 88 लाख 17 हजार 829 रुपयांची दारू चोरी झाल्याने, कंपनीच्या प्रतिनिधीने 8 सप्टेंबर रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात ट्रक चालक प्रभाकर विश्वनाथ घुगे याच्या विरुद्ध फिर्याद देत गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर, जिंतूर पोलिसांनी ट्रक चालकास पुणे येथून ताब्यात घेतले आणि तीन आरोपी नामे अनिल शिवाजी चव्हाण, रविंद्र हरिभाऊ पवार आणि सचिन अशोक सोळंके यांना दि. 26 सप्टेंबर रोजी अटक केली होती.

या तीन आरोपींच्या माध्यमातून पोलिसांनी 65 लाख 39 हजार 720 रुपयांची दारू जप्त केल्याचा दावा केला होता. यानंतर, पोलिसांनी जवळपास मकोका सारखेच असणारे संघटित गुन्हेगारी टोळी बाबतचे भारतीय न्याय संहितेतील कलम 111 लावले होते, यामुळे प्रकरणाची गंभीरता वाढली होती. त्यामुळे, आरोपींना तब्बल 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
जिंतूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या तीन आरोपींना न्यायालयीन कोठडीत घेत आरोपींची परभणी येथील जिल्हा कारागृहात रवानगी केली होती.तदनंतर, आरोपींनी परभणी येथील जिल्हा सत्र न्यायालयात ॲड. सुनिल बुधवंत यांच्या मार्फत जामिनावर सोडण्यासाठीचा विनंती अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर सुनावणी दरम्यान ॲड. सुनिल बुधवंत यांनी आरोपींच्या बाजूने सखोल युक्तिवाद करत त्यांची ठोस बाजू मांडली, जिंतूर पोलिसांतर्फे तपासी अधिकाऱ्यांनी हजर होऊन त्यांचे म्हणणे मांडले व सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. सर्व बाजू ऐकल्यानंतर, मा. न्यायालयाने तीनही आरोपींना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.
ॲड. सुनिल बुधवंत यांना या प्रकरणात ॲड. भगवान घुगे आणि ॲड. नरेश गव्हाणे यांनी सहकार्य केले.*चौकट*पोलिसांनी, या प्रकरणाची गंभीरता वाढवण्यासाठी जवळपास मकोका सारखेच असणारे संघटित गुन्हेगारी टोळी बाबतचे भारतीय न्याय संहितेतील कलम 111 लावले होते. परंतू, ॲड. सुनिल बुधवंत यांनी याबद्दल सविस्तर अभ्यासपूर्ण मांडणी करत, कलम 111 या प्रकरणात लागू शकत नाही हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?