चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण परभणीत
परभणी (अजमत पठाण):-
राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष श्री भाऊसाहेब पठाण हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वर्ग 4 कर्मचारी — कायमस्वरूपी (परमनंट) असोत की कराराधारित (कॉन्ट्रॅक्ट बेस) — यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, समस्या व शासकीय पातळीवरील प्रलंबित प्रश्न याबाबत विचारविनिमय करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक दिनांक 23 ऑक्टोबर 2025, वार गुरुवार, सकाळी 11 वाजता, जिल्हा रुग्णालय, परभणी येथील प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे.बैठकीदरम्यान सर्व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या सेवा-संबंधी अडचणी, स्थानांतर, नियमितीकरण, वेतनवाढ, तसेच शासन निर्णयांची अंमलबजावणी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

राज्याध्यक्ष पठाण हे या विषयांवर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या सूचना ऐकून त्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन देणार आहेत.या बैठकीत परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील वर्ग 4 कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या संदर्भात श्री सिराज शेख, जिल्हाध्यक्ष – राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, जिल्हा शाखा परभणी यांनी सर्व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे की, आपले हक्क व प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी या बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे.ह्या बैठकीमुळे परभणी जिल्ह्यातील शासकीय सेवकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना दिशा मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

जिंतूर पोलिसांचा मोठा धडाका; कत्तलीच्या संशयाने ७ बैलांची सुटका, ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त”
जिंतूर शहरात गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार!
घरासमोर युवकावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज