वरुड (नृ.) जिल्हा परिषद गटातून इंजिनियर रामदास आढे निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतुर (अजमत पठाण):–
जिंतूर तालुक्यातील वरुड ( नृ.) जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर रामदास आढे (रा. मालेगाव ता. जिंतूर ) हे उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार ठरत असून, त्यांचे तिकीट जवळपास निश्चित झाल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
रामदास आढे यांनी गेल्या काही वर्षांपासून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील युवकांना राजकारणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने काम केले आहे. युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेली भूमिका लक्षवेधी ठरली आहे.

स्थानिक पातळीवर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृती उपक्रमांमुळे त्यांचा संपर्क जनतेशी घट्ट झाला असून, त्यांच्या कार्यशैलीबद्दल मतदारांमध्ये सकारात्मक भावना आहे. त्यामुळे वरुड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा विजयाने फडकविण्याची शक्यता अधिक वाढली आहे.पक्षाच्या तालुका तसेच जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी रामदास आढे यांच्या उमेदवारीसाठी समर्थन व्यक्त केले आहे.
“युवकांना संधी देऊन नवा विचार पुढे नेण्याचा पक्षाचा निर्णय योग्य आहे,” असे कार्यकर्त्यांचे मत आहे.रामदास आढे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की,“मा.शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवून विकासावर आधारित राजकारण करणे हेच माझे ध्येय आहे.
वरुड गटातील नागरिकांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन,” असे त्यांनी सांगितले.दरम्यान, आगामी काही दिवसांत पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होणार असून, त्यानंतर प्रचाराचा प्रारंभ होईल.

अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज
शिवसेना (उबाटा गट) कडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल- सुरेखा शेवाळे-टाळे
जिंतूर पोलिसांची कारवाई — प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त.
प्रभाग आठच्या सर्वांगीण विकासासाठी समीर भैय्या जानीमीया निवडणुकीच्या रिंगणात.
जिंतूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक — उमेदवारीत रस्सीखेच की पैशाचा खेळ?