शेतकरी पीकनुकसानीबाबत तहसीलदारांना शिवसेनेचे निवेदन — तत्काळ पंचनामे व मदतीची मागणी.
जिंतूर (अजमत पठाण):- अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे जिंतूर येथील तहसीलदारांना देण्यात आले.हे निवेदन शिवसेना शहर प्रमुख अरविंद हरीभाऊ कटारे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.
अवकाळी पावसामुळे सोयाबीन, तूर, उडीद, कापूस, तसेच भाजीपाला यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने घेतलेले पीक पावसामुळे सडून गेले असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून मदत देण्यात यावी.
अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.”निवेदनादरम्यान शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद कटारे, सुरेखा (शेवाळे) टाले उपजिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, गंगासाहेब घुगे (शिवसेना संपर्कप्रमुख), राजूभाऊ काळे (तालुका प्रमुख), सुरेश शेकोटे (उपजिल्हाप्रमुख), तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, “जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिवसरात्र परिश्रम घेऊन पीक घेतले, मात्र सततच्या पावसामुळे त्यांच्या आशा पूर्णपणे पाण्यात गेल्या. शेतकरी निराश झाले आहेत.
शासनाने तातडीने सर्वेक्षण करून मदत जाहीर केली पाहिजे.”तहसील कार्यालयात हे निवेदन १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सादर करण्यात आले असून, प्राप्तीची नोंद आवडान जाधव (नायब तहसीलदार) यांनी केली.शिवसेनेने प्रशासनास इशारा दिला आहे.

जिंतूर पोलिसांचा मोठा धडाका; कत्तलीच्या संशयाने ७ बैलांची सुटका, ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त”
जिंतूर शहरात गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार!
घरासमोर युवकावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज