प्रा. धोंडगे यांना ‘रासेयो’ उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार
जिंतूर,दि.27(अजमत पठाण) : येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रो. डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांना नुकताच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. धोंडगे हे ज्ञानोपासक महाविद्यालयात मागील चार वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. धोंडगे व डॉ. निवृत्ती पोपतवार, प्रा. संतोष कदम यांनी कोरोना काळात जिंतूर तालुक्यात कोविड लसीकरण जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवली होती.
तसेच कोविड लसीकरण शिबिराचेही आयोजन केले होते. याशिवाय मागील तीन वर्षांत महाविद्यालय परिसर व दत्तक घेतलेल्या अंबरवाडी आणि येनोली या गावांमध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती हे उपक्रम राबवले. तसेच विशेष वार्षिक शिबिरांतून विशेष व्याख्यात्यांची विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करून प्रबोधनाचा जागर केला.

तथा प्रभातफेरीद्वारे सामाजिक समस्यांविषयी जनजागृती केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सन 2023-2024 यावर्षीच्या परभणी जिल्हा मउत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने डॉ. धोंडगे यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजीमंत्री ड. गणेशराव दुधगावकर, सचिव डॉ. सौ. संध्औ़याताई दुधगावकर, सहसचिव इंजि. समीर दुधगावकर, प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे, प्राचार्य डॉ. शेख मोहम्मद बाबर, उपप्राचार्य डॉ. श्याम गोरे, उपप्राचार्य मुंजाजी दाभाडे, उपप्राचार्य विजय घोडके यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जिंतूर पोलिसांचा मोठा धडाका; कत्तलीच्या संशयाने ७ बैलांची सुटका, ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त”
जिंतूर शहरात गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा प्रहार!
घरासमोर युवकावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
जिंतूरात भाजपची मुसंडी जि.प. च्या दहा पैकी सहा जागी भाजप विजयी.
अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडूनही कारवाई न करता तलाठ्याने सोडल्याचा आरोप.
प्रभाग 12 मधून भाजपाचे हाजी शेख अथर महंमद नुर व पठाण महेमुन्ननिसा बेगम फायजखान यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज